तेंदुपत्ता कंपनीवर आणि वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - अखिल भारतीय माळी महासंघ मूलची मागणी.
एस.के.24 तास
मुल : बफर झोन क्षेत्रात वनविभाग आणि तेंदुपत्ता कंपनीने जबरदस्तीने मजुरांनस तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी पाठविल्यामुळे भादुर्णी येथिल खुशाल सोनुले या मजुराचा जिव गेला असल्याचा आरोप करून तेंदुपत्ता कंपनीवर आणि वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाने केली आहे.
तेंदुपत्ता संकलनासाठी मे.प्रभात इंटरप्राईजेस रोलटोली गोंदिया या कंपनीच्या माध्यमातुन वनविभागाच्या परवानगीने तेंदुपत्ता संकलनाचे काम दिले असल्यामुळे मजुरांना बफरझोन क्षेत्रात पाठविल्या जाते.तेंदुपत्ता कंपनी आणि वनविभाग यांच्या जेबाबदार व बेकायदेशिरपनामुळे तेंदुपता संकलन करीत असतांना भादुर्णा येथिल खुशाल सोनुले या मजुराचा जिव गेला.
बफर झोन हा अभयारण्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र आहे, या झोनमध्ये जाण्यास कोणालाही परवानगी नाही. असे असतांना कंपनीने जबरदस्तीने वनविभागाच्या परवानगीने तेंदुपत्ता संकलनासाठी पाठविणे हे बेकायदेशिर असुन महाराष्ट्र वनकायद्याचा उलंघन करणारी बाब आहे. वनविभागाच्या कायद्यांना सुद्धा धाब्यावर बसवुन राजरोजपणे हजरो मजुरांचे जीव धोक्यात घालण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मे.प्रभात ईटरप्राईजेस रोलटोली गोंदिया आणि स्थानिक वनविभाग दोषी असल्यामुळे दोघांवरही सदोष मुनुष्यवधाचा गुन्हा कंपनीचे चेअरमन आणि वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा.अश्या मागणीचे निवेदन मुलचे उपविभागिय अधिकारी यांना देण्यात आले.
निवेदन देतांना पंचायत समितीच्या माजी सदस्या,वर्षा लोनबले,अखिल भारतीय माळी महासंघ मुलचे ईश्वर लोनबले,नंदु बारस्कर,राजेंद्र वाढई,ओमदेव मोहुर्ले, गोपाळा सोनुले,रामदास गुरुनूले मृतकाची पत्नी, ज्योस्ना सोनुले आणि मुलगा हेमंत सोनुले आदी उपस्थीत होते.