बुद्ध पोर्णिमे निमित्य ओ.बी सी.चे राजकीय आरक्षणावर चर्चासत्र.
अखिल भारतीय माळी महासंघा ची बैठक.
अँड,राजेंद्र महाडोळे प्रदेश अध्यक्ष,अखिल भा.महासंघ उपस्थित होते.
राजेंद्र वाढई ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास
चंद्रपूर : दि.16 मे 2022 रोजी नवभारत विद्यालय , मूल येथे अखिल भारतीय माळी महासंघ तालुका मूल च्या वतीने महामानव गौतम बुद्ध पोर्णिमचं औचित्य साधून संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली, बैठकीचे अध्यक्ष, संघटनेचे प्रदेश अध्यक्ष,अॅड. राजेंद्र महाडोळे, जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य नानाजी पाटील आदे डाॅ. पदमाकर लेनगुरे, ओ.बी.सी. संघटनेचे सरचिटणीस, गुरूदास चौधरी,माजी प.स.सदस्य सौ.वर्षाताई राजेंद्र लोनबले यवतमाळ अखिल भारतीय माळी महासंघाचे विठ्ठलराव नाकतोडे लोनबले,,सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गुरूनुले ,मंचावर उपस्थित होते, मान्यवरांचे हस्ते प्रथम दिप प्रज्वलन करून महामानव गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा फुले, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमाना अभिवादन करण्यात आले ,तालुक्यातील विद्यमान , माजी संरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांना संघटनेच्या वतीने पुष्प गुच्छ देवून संमानीत करण्यात आले
डाॅ. पदमाकर लेनगुरे यांनी महामानवा च्या जीवन कार्या वर मनोगत व्यक् करून आजचा ओ.बी.सी समाज जीवन प्रवास दशा आणि दिशा यावर आपले विचार मांडले
गुरूदास चौधरी सर यांनी ओ.बी सी. समाजाचा संघर्ष आपल्या अभ्यासू शैलीतून मांडला, नानाजी पाटील आदे यांनी ओबीसी चळवळीची आजची गरज व्यक् केली व माळी समाज हा ओबीसी मधील मोठा घटक असल्याने माळी समाजानी एकत्रीत, संघटीत पणे लढा उभारावा असं आव्हान केले बैठकीचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी विस्तृत आणि मुद्देसूद संघटनेचे महत्व विशद करून स्वराज्य संस्थाच्या राजकीय आरक्षणाला कोणतेही सरकार विरोध करीत नाही तर मग ओबीसीना न्याय का मिळत नाही आरक्षणाला विरोध कोण करीत आहेत असा सवाल उपस्थित केला.
सर्व राजकिय पार्टीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून संघर्ष करावा,ओबीसी चा आवाज जनतेतून पुढे यावा, सर्व ओबीसी बांधव एकत्रीत आवाज उठवला पाहिजे नेत्यानी व कार्यकर्त्यांनी आपलं राजकारण बाजूला ठेवून आता रस्त्यावर उतरावे, स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूकावर बहिष्कार घालावा असे आव्हान केले.
तसेच या मागनीला पूढे लावून धरण्यासाठी 28 मे 2022 रोजी ओबीसी आरक्षण समीक्षा संदर्भात नागपूर येथे भाटीया आयोग येणार आहे त्याचे समक्ष ओबीसी समाजाची राजकीय, सामाजिक,आर्थिक शैक्षणिक मागासलेपणा यावर साक्ष नोंदविण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून ओबीसी बांधवांची समिती गठीत करून आपले म्हणने आयोगा पूढे मांडावे असे आव्हान केले.
या बैठकीला विद्यमान सरपंच सतीश चौधरी टेकाडी, अनिल सोनूले सुशि,प्रदिप वाढई विरई,माजी सरपंच अनिल शेंडे चिरोली,अनिल निकेसर फिसकूटी सामाजिक कार्यकर्ते बंडू भाऊ गुरूनुले,चतुरजी मोहूरले,सामाजिक कार्यकर्ते व एस.के.24 तास चे कार्यकारी संपादक राजेंद्र वाढई, विनायक निकोडे,पंकज निकूरे,अतुल लेनगुरे दामोधर लेनगुरे,गजानन लेनगुरे, प्रदिप वाढई, डाॅ.दौलत शेंडे,बापूजी चौधरी,गिरीधर चौधरी,भाग्यवान मोहूरले बंडू मांदाळे, विनायक शेंडे, भेजगाव माळी समाज अध्यक्ष प्रकाशजी शेंडे
तालुक्यातून आलेले सामाजिक कार्यकर्ते, इत्यादी समाज बांधव शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.