तेंदूपत्ता संकलक वाघाच्या हल्ल्यात ठार. वनविभागातर्फे पंचवीस हजार रू.ची तात्काळ मदत.



तेंदूपत्ता संकलक वाघाच्या हल्ल्यात ठार. वनविभागातर्फे पंचवीस हजार रू.ची तात्काळ मदत.


एस.के.24 तास


मुल : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका शेतमजूरावर वाघाने हल्ला करून ठार केले.ही घटना रविवारच्या सकाळी दहा वाजताच्या दरम्यान  सोमनाथ लगतच्या जंगलात उघडकीस आली.मृतकाचे नाव खुशाल सोनूले वय 54 वर्षे असे असून तो भादूर्णी येथील रहिवासी होता.  छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडला देह सापडला. वनविभागाने तातडीने पंचवीस हजार रूपयांची मदत नातेवाईकांच्या सुपूर्द केली. मुल पासून आठ किलोमीटर अंतरावर भादूर्णी हे गाव आहे. सदया तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. मौजा भादूर्णी  येथील शेतमजूर  खुशाल गोविंदा सोनूले  वय (५४ ) हा शनिवारी सकाळी तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात  गेला होता. तेंदूपत्ता संकलन करुन जंगलातुन गावाकडे परत येत असतांना सोमनाथ परिसरातील जंगलात फिरत असलेल्या वाघाने त्याच्यावर  हल्ला करुन त्यास जागीच ठार केले.एवढेच नाहीतर त्याच्या देहाचे छिन्न-विच्छिन्न तुकडे तुकडे करून इतरत्र टाकल्याचे दिसून आले. खुशाल अजूनही परत का आला नाही याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी काही गावकऱ्यांसोबत जंगलात जाऊन शोध घेतला.मात्र  रात्र झाल्याने  दुस—या दिवशी शोध मोहीम राबविली असता सोमनाथ लगतच्या जंगलात त्याचे देहाचे तुकडे तुकडेच सापडले घटनास्थळी  वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. जी.आर. नायगमकर, क्षेत्र सहाय्यक, श्री. पाकेवार, वनरक्षक वड्डे, पारडे, उईके यांनी भेट देवून पंचनामा केला.

मृतक खुशाल सोनूले यांच्या मागे पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.घटनेची माहिती मिळताच गावकरी लगेच  घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती  पोलीस स्टेशन मुल यांना दिली असता पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांनी आपल्या सहकाऱ्याना घटनास्थळी पाठवून मोका चौकशी केळी व मृत्यूदेह मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात  शव विच्छेदनासाठी पाठविले. याप्रसंगी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.आर. नायगमकर  क्षेत्र सहाय्यक श्री. पाकेवार, तीन वनरक्षक यांचेसह माजी सरपंच संतोष रेगुंडवार, अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.


 वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. जी.आर. नायगमकर यांनी मृतकांच्या नातेवाईकास तात्काळ २५,००० (पंचवीस हजार रुपये) आर्थिक मदत दिली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करीत आहेत तर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. नुकतेच मौजा कोसंबी येथे शेतात काम करीत असलेल्या महिलेवर आणि एका गुराख्यावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना अजूनही ताजी आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !