सुरज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने दिला दिलासा .

सुरज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने दिला दिलासा .


एस.के.24 तास


चंद्रपूर : सुरज ठाकरे यांच्या विरोधात दिनांक २३/०४/२०२२ रोजी सोशल मीडियावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे १५३(अ) कलमा अंतर्गत राजुरा पोलीस स्टेशन येथे शिवसैनिकांच्या दबावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


परंतु कलम १५३(अ) च्या कायदेशिर व्याखे नुसार सुरज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य या कल्मांतर्गत बसत नसल्याचा दावा सुरज ठाकरे यांचे वकील ॲड.अल्पेश देशमुख यांनी न्यायालयात करत सुरज ठाकरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात सदर कलम रद्द करण्याकरिता अपील दाखल केली होती त्यावर आज दिनांक १२/०५/२०२२.रोजी संबंधित दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल करू नये असा आदेश उच्च न्यायालयाने दिला असल्याने सुरज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे .पुढील सुनावणी २७/०६/२०२२ रोजी होणार असून आता राजुरा पोलीस यावर काय उत्तर दाखल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सत्तेचा गैरवापर करीत खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप सुरज ठाकरे यांनी केला आहे . या सर्व षडयंत्राला तोडीस तोड उत्तर देवून निर्दोष बाहेर येणार असल्याचे सुरज ठाकरे यांनी या वेळी सांगितले व न्यायालयाचे आभार मानले आहे .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !