कांतापेठ येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.
राजेंद्र वाढई - कार्यकारी संपादक एस.के.24 तास
मुल : आज दिनांक,10/05/2022 मंगळवार ला अंदाजे दुपारी 9.30 वा.च्या दरम्यान सुरज नानाजी मांदाळे पोटाच्या आजाराने कंटाळून आत्महत्या केली.
मृतकाचे आई-वडील तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेले होते.घरी आल्यावर मुलगा दिसला नाही तर घरा शेजारी विचारपूस केली असता.मुलगा आता पर्यंत होता असे सांगितले.त्यानंतर आई घरात गेली असता मधल्या खोलीत मुलगा गळफास घेऊन होता.त्याला जवळ जाऊन बघितले असता तो मृत अवस्थेत होता.
सुरज पाच वर्षापासून पोटाच्या आजाराने त्रस्त होता.घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे त्याच्या उपचारासाठी वेळोवेळी पैसा नसल्यामुळे त्याचा उपचार बरोबर न झाल्यामुळे तो तो कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केला.त्याच्या मृत्यूने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन मुल अंतर्गत चिरोली चौकीत माहिती देण्यात आली.घटनास्थळी मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक,राजपूत साहेब,
चिरोली पोलीस चौकी चे,पोलीस कर्मचारी,सुरेश ज्ञानबोनवार,गणेश मेश्राम उपस्थित होते.जावून शव बाहेर काढून सामान्य रुग्णालय मुल येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले.पुढील तपास पोलीस करीत आहेत.