6 वर्षीय चिमुकली वर 30 वर्षीय नराधमाने अत्याचार करून टाकले काटेरी फासात. ★ नराधम आरोपीस मारेगाव पोलिसांनी केली अटक.

6 वर्षीय चिमुकली वर 30 वर्षीय नराधमाने अत्याचार करून टाकले काटेरी फासात.


★ नराधम आरोपीस मारेगाव पोलिसांनी केली अटक.


एस.के.24 तास


यवतमाळ : जिल्ह्यातील तालुका मारेगाव  6 वर्षीय चिमुकलीवर एका 30 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून पिडितेस चक्क काटेरी फासात टाकल्याची मानव जातीला काळीमा फासणारी संतापजनक घटना तालुक्यातील पहापळ येथे घडली.मारोती मधुकर भेंडाळे रा.पहापळ असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे.


प्राप्त माहिती नुसार 9 मे रोजी पहापळ येथे एका घरी विवाह संदर्भात कार्यक्रम सुरू असतांना रात्री 8 वाजताचे दरम्यान सहा वर्षीय बालिकेस तिच्या आजीने गावालगत असलेल्या शेतात शौचास नेले.आजी घराशेजारी आल्यानंतर उशिरापर्यंत नात कार्यक्रमस्थळी आलीच नाही.रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने बालिकेचा शोध घेण्यासाठी गावातील लोकांनी रात्रभर परिसर पिंजून काढले.परंतू ती आढळली नाही.मात्र 10 में च्या दुसऱ्या दिवशी सकाळी गावापासून एक कि.मी.अंतरावर एका काटेरी फासात ती रक्तबंबाळ अवस्थेत चिमुकली आढळली.


दरम्यान वणी येथे प्राथमिक उपचारानंतर तिला यवतमाळ येथे हलविण्यात आले.तपासणी अंती चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.दरम्यान बालिकेला विश्वासात घेतले.तिने संशायित आरोपीचे थेट नाव सांगत नराधमांने केलेल्या कृत्याची आपबीती सांगितले.


या प्रकरणी नराधम आरोपी विरोधात भांदवी कलम ३६३ व ३७६सहकलम पोक्सो ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मारोती मधुकर भेंडाळे याना राळेगाव तालुक्यातील वडकी येथून अटक करण्यात आली आहे.पुढील तपास विजय वानखडे, रवींद्र इसणकर,संतोष कलवलवार ,अमोल नुंनेलवार व स्थानिक मारेगाव पोलीस करीत आहे.


तालुक्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने अवघा तालुका हादरला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !