राष्ट्रवादी कांग्रेस नागभीड शहर व तालुका तर्फे जाहिर निषेध ; नागभीड एस.टी.बस स्थानक समोर जाहिर निषेध.
एस.के.24 तास
नागभीड : एस.टी.कर्मचारयांचा खांदयावर बंदूक ठेवून देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांच्या घरावर पड़द्यामागून भ्याड हमला करणाऱ्या राजकीय शक्तिचा वापर करून आदरणीय शरद पवार साहेबांच्या घरावर आज काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते.
महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवार साहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून, आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.यावेळी शहर अध्यक्ष रियाज शेख,तालुका अध्यक्ष विनोद नवघड़े,युवक तालुका अध्यक्ष प्रशांत गायकवाड, युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख, जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख, जिल्हा संघटक भाऊरावजी डांगे,युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे,महिला जिल्हा उपाध्यक्ष नारायने ताई, तालुका अध्यक्ष रेवतकर, शहर अध्यक्ष सोनकुसरे ताई, शहर कार्यध्यक्ष खापर्देताई ,तालुका सचिव प्रतिभा साखरकर,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सादिकभाई शेख, शेखर नारायने, शाखा अध्यक्ष जितु चौधरी, शाखा अध्यक्ष श्रावण धारने, संदीप डांगे, शांताराम रंधये,प्रभाकर नीकुरे, संजय कुम्भले, शुभम कावळे, उमेश नीकुरे, खेमचंद मांधरे तसेच इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.