अबब...लक्षावधि रूपयाचे काम मोबदला मात्र थातुरमातुर.
★ मजूराचा आरोप.
★ कामावर टाकला मजूरानी बहिष्कार.
★ बोथली ( हेटी ) येथील प्रकार.
★ ५ लक्ष रु नाला खोलिकरनाचे सुरु होते काम.
एस.के.24 तास
सावली : (लोकमत दुधे) रोहयो अंतर्गत काम योग्य रीतीने करीत असताना कामाचा मोबदला योग्य मिळत नसल्याचा आरोप करीत शुक्रवार रोजी कामावर असलेल्या शेकडो मजूरानी एक दिवस काम बंद ठेऊन कामावर बहिष्कार टाकल्याचा प्रकार बोथली ग्रा प अंतर्गत समोर येत आहे त्यामुळे लक्षावधि रूपयाच्या कामाचा मोबदला थातुरमातुर दिला जात असल्याचा आरोप करीत तांत्रिक अधिका ऱ्याला बदलविन्यात यावे अशी मागणी मजूरामार्फ़त केलि जात आहे तालुक्यातील अनेक ग्रा प अंतर्गत रोहयो चे काम सुरु आहे या निमित्याने हज्ज़ारो मजूराना रोजगार उपलब्ध झाला सावली येथून जवळच आणि तालुक्यातील बोथली ग्रा प अंतर्गत ५ लक्ष रु चे नाला खोलिकरणाचे काम सुरु करण्यात आले आठवड़ा भरापासुन कामाला सुरुवात झाली असताना कामाच्या मुल्यांकना नतर कामावर असलेल्या मजूराना ३५ ते ८० रु पर्यंत मोबदला दिला जाणार असल्याची चाहूल लागताच भाम्बावलेल्या मजूरानी तांत्रिक अधिका ऱ्याने योग्य कामाचे मुल्यांकना न केल्याने मजूरिचा मोबदला योग्य मिळू न शकल्याने तांत्रिक अधिका ऱ्याला बदलविन्यात यावे अशी मागणी करत आज रोजी कामावर गेलेल्या शेकडो मजूरानी काम न करता कामावर बहिष्कार टाकला योग्य काम करुन मोबदला योग्य मिळत नसेल तर काम नेमके कोणत्या प्रकारे करावे असा प्रश्न मजूरासमोर निर्माण झाला आहे तालुक्यात सर्वत्र रोहयो कामाचा धडाका सुरु झला असून या निमित्याने तालुक्यातील हजारो मजूरांच्या हाताला काम मिळाले मात्र मुल्यांकनाच्या आधारावर कामाचा मोबदला कमी मिळत असल्याचा आरोप तालुक्यातील रोहयो कामावर जाना ऱ्या अनेक मजूराकड़ून केला जात आहे ग्रामीण भागातील अकुशल मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांना आपल्या गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, या उद्देशाने सुरू झालेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सावली तालुक्यात युद्धस्तरावर सुरू आहेत
राज्यात सुरु असलेली रोजगार हमी ही योजना मजुरांसाठी वरदान ठरल्यामुळे 2005 मध्ये केंद्र सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी कायदा कायदा केला. 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना' ही मजुरांना गावातच काम मिळावे या उद्देशाने निर्माण झालेली योजना आहे. ही एकमेव अशी योजना आहे की त्यात ग्रामीण भागातील व शेतीशी निगडीत कामे होऊन प्रत्यक्षात मजुरांच्या हाताला काम देणारी योजना आहे. या योजनेंतर्गत पांदण रस्ते, तलाव बोडी खोलीकरण, नाला खोलीकरण, मजगी, शेततळे, वृक्षलागवड, सौचालय, सिंचन विहिरी, गुरांचे गोठे, शोषखड्डे ही सामूहिक व वैयक्तिक कामे केली जातात. सावली तालुक्यात शेतीशिवाय रोजगाराचे दुसरे साधन नाही व यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतीही बुडाली यामुळे शेतकरी व मजुरांना कामाशिवाय पर्याय नाही. याबाब तालुक्यात मजुरांना काम मिळावे यासाठी मोठा प्रयत्न केला गेला जिल्ह्यातून सर्वात जास्त सावली तालुक्यातील मजुरांना काम देण्यात आले आहे. आजचे घडीला ४८ ग्रामपंचायतमध्ये काम सुरू असून १० हजारांचे वर मजूर काम करीत आहेत मात्र मुल्यांकनाच्या आधारे कामाचे मेजरमैंट सुरु असल्याने कामावर येना ऱ्या मजूराना मोबदला कमी दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे.