कुलरच्या धक्याने चिमुकल्या युगचा मृत्यु.
★ चिमुकल्या युगचा मृत्यु झाल्याचे समजताच परिसरात संपूर्ण हळहळ.
एस.के.24 तास
मुल : येथील युग महेश जेंगठे या पाच वर्षीय बालकांचा कुलरचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाल्यांची घटना घडली. या दुर्देवी घटनेमुळे जेंगठे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. युग हा मूल येथील सेंट अॅनेस स्कुलला केजी 2 मध्ये शिकत होता.
एक दिवसापूर्वीच महेश जेंगठे यांनी कुलर लावला होता. आज दुपारी 12 वाजताचे दरम्यान युग खेळत - खेळत कुलरचे स्टॅंडला जावून पकडला व तीथेच शॉक लागून जागेवरच पडला. ही बाब घरच्यांच्या लगेच लक्षात येताच युगला मूल येथील उपजिल्हा ग्रामिण रूग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. युग यांचे निधनाची बातमी शहरात वार्यासारखी पसरताच अनेकांनी महेश जेंगठे यांचे घरी गर्दी केली.
मूल येथील प्रतिष्ठीत युवक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी महेश जेंगठे पदाधिकारी असून त्यांना दोन मुले आहेत. युग हा लहान मुलगा होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.