वाघाच्या हल्यात एका इसमाचा मृत्यू.

 


वाघाच्या हल्यात एका इसमाचा मृत्यू.


एस.के.24 तास


मुल : तालुक्यातील मारोडा गावाचा रहिवाशी श्री,गजानन गुरनूले वय,60 वर्षे नेहमीप्रमाणे गावाजवळच्या शेतात बैल चरावयास गेला होता. संध्याकाळच्या वेळीस गावात बैल आले पण बैल राखणारा गजानन परत न आल्याने गावात शोधाशोध घेण्यास  सुरुवात केली. जिथे तो बैल चारावायला गेला त्या शेतात रात्रीच्या 8.30 च्या दरम्यान गेले असता त्याची  टोपी तर थोड्या अंतरावर त्याचा ढोतर सापळला. त्याच दिशेनं शोधत सोमनाथ डोंगराच्या पायथ्याशी डोंगरदेवीच्याच्या जवळ गजानन चे मृत्यक शरीर सापळल.त्याची वन विभागाला तसेच पोलीसाना माहिती देण्यात आली. त्याची पंचनामा सुरू आहे.


सघ्या मारोडा गावाच्या शेतशिवारात वाघाचे वावर वाढलं आहे. मृतक हा या पूर्वी सुध्या 2021च्या उन्हाळ्याच्या काळात त्याच्यावर वाघाचा हल्ला झाला होता. मात्र त्या हल्यात  तो जखमी झाला आणि प्राण वाचले होते. मात्र आज दि. 30/4/2022 ला दुपारच्या वेळेस त्याच्यावर झालेल्या वाघाच्या हल्यात मृत्यू झाला. त्याने मारोडा गावात पुन्हा एकदा वाघाच्या दहशतीमुळे भीतीच वातावरण पसरले आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !