वाढदिवसानिमित्त आदिवासी वस्तीत मातीचे माठ आणि फणसाच्या रोपांचे वाटप.


वाढदिवसानिमित्त आदिवासी वस्तीत मातीचे माठ आणि फणसाच्या रोपांचे वाटप.


राजेंद्र वाढई ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास


मुल : दि.४/४/२०२२ नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा चंद्रपूर,तालुका मुल तेजस्विनी नागोसे आणि श्री.श्रीरंग नागोसे यांची मुलगी श्रद्धा चौहान (१८ मार्च),मुलगा निशांत (४ एप्रिल) आणि राष्ट्रीय अध्यक्ष सन्मा.सुयोग धस सर (५ एप्रिल ) यांचा वाढदिवस संयुक्तपणे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात मुल तालुक्यातील फुलझरी या आदिवासी गावात असलेल्या क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला मालार्पण करून करण्यात आले. निशांत आणि श्रद्धा यांचे वाढदिवसानिमित्त गरिबांचे फ्रिज मातीचे ५६ माठ आणि सन्मा.सुयोग धस सर यांच्या वाढदिवसानिमित्त ३२फणसाच्या रोपांच्या वाटपाची सुरवात नागोसे मॅडम यांच्या आई प्रमिला शेंडे यांच्या हस्ते करण्यात आली.
पर्यावरण प्रेमी हेमंत सुपनेर यांचाही वाढदिवस होता त्यांना फणसाचे रोप देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच पर्यावरण आणि मानवता विकास अंतर्गत उल्लेखनीय,उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वार्षिक संमेलनाचे सन्मानचिन्ह सौ.सुषमा कुंटावार चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष,श्री.नागोसे सर नागपूर विभाग उपाध्यक्ष,श्री.चौधरी सर नागपूर विभाग सहसचिव यांना याच कार्यक्रमात सन्मानपूर्वक देण्यात आले.


हा कार्यक्रम तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, नागपूर विभाग अध्यक्षा,रत्ना चौधरी, नागपूर विभाग उपाध्यक्षा,ललिता मुस्कावार,नागपूर विभाग उपाध्यक्ष,नागोसे सर, नागपूर विभाग सचिव,कविता मोहुर्ले,नागपूर विभाग सहसचिव चौधरी सर,चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा सुषमा कुंटावार, जिल्हा उपाध्यक्षा,अल्का राजमलवार,मुल तालुका अध्यक्षा,मिरा शेंडे,तालुका उपाध्यक्षा,वंदना गुरनुले, तालुका संघटिका,शशिकला गावतुरे,सुनिता खोब्रागडे,इंदू मांदाडे,निता कटकुरवार,वंदना वाकडे,देवगडे सर,पर्यावरण प्रेमी,प्रमीला शेंडे, देवगडे मॅडम,सूपनेर सर,प्रत्युष सुपनेर,ओम शेंडे, सामाजिक कार्यकर्ते तथा कांग्रेस कमिटी ओ.बि. सी.विभाग मुल तालुका ग्रामीण अध्यक्ष,एस.के.24 तास चे कार्यकारी संपादक,राजेंद्र भाऊ वाढई,जानाळा गट ग्राम पंचायत सदस्य रविंद्र मरापे,ढोले काकाजी तसेच फुलझरी येथील गावकरी यांचे उपस्थितीत पार पडला.मुलांना बिस्किटे वाटुन कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !