रोजगार हमी योजना कामात दाखविले बोगस मजूर. - वर्षा लोनंबले यांची दोषींवर कारवाई करण्याची मागणी.

 


रोजगार हमी योजना कामात दाखविले बोगस मजूर. - वर्षा लोनंबले यांची दोषींवर कारवाई करण्याची मागणी.


एस.के.24 तास


 मुल : तालुक्यातील टोलेवाही येथे बोगस मजूर दाखवून रोजगार हमी योजना कामात गैरव्यवहार करण्यात आला याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुल पंचायत समितीच्या माजी सदस्य,वर्षाताई लोनंबले यांनी केली आहे.


त्यांनी याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे टोलेवाही येथे स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. चार आठवड्यापासून येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमे योजनेअंतर्गत नाला खोली करणाचे काम सुरू आहे.रोजगार सेवक,चंद्रकांत भंडारे यांच्या देखरेखी खाली काम सुरू आहे. दीडशे ते दोनशे मजूर कामावर दाखविले आहेत.


त्यापैकी टोलेवाही येथील सागर आबाजी मोहुल्रे,दयानंद माधव निकुरे,बंडू रामदास महाडोळे,अर्चना अनिल मोहुर्ले,अनिल मारोती मोहुर्ले,मारोती लिंगा मोहुर्ले,रघुनाथराव गेडाम,सुनिता शामराव भंडारे,शीला संजय येलमलवार,देवदास एकनाथ लेनगुरे,आदी अकरा व्यक्ती नाला खोलीकरण वृक्ष लागवड अथवा रोजगार हमी योजनेचा कोणत्याही कामावर गेले नाही.तरी हे कामावर असल्याचे दाखवून त्यांच्या नावाने बँकेत पैसे जमा केलेले आहेत काही मजुरांना रोख रक्कम देऊन संबंधित रोजगार.सेवकाने मोठा गैरव्यवहार केल्याचे वर्षा लोनंबले यांनी तक्रारीत म्हटले आहे.बोगस मजूर दाखवून रोजगार हमी योजनेच्या निधीची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावल्या गेली आहे सदर कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे दोषींवर कारवाई न झाल्यास पंचायत समिती समोर आंदोलनाचा इशारा त्यांना दिला आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !