अंगणात झोपलेल्या इसमास बिबट्यांनी केले ठार.
एस.के.24 तास
सिंदेवाही : गर्मी मुळे त्रस्त झालेले ग्रामीण भागातील लोक बाहेर अंगणात झोपतात. असेच असे झोपणे माणिक बुद्धा नन्नावरे च्या जीवावर बेतले. काल रात्रौ, तो बाहेर अंगणात झोपलेला असताना बिबट्यांनी त्याची शिकार केली यामुळे बुधा ननावरे जागीच ठार झाला.
सरडपार चक येथे अंगणात झोपून असलेल्या माणिक बुधा नन्नावरे वय ७० या व्यक्तीला बिबट्याने रात्रौ ठार केले.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून, जंगलातील वन्यप्राणी गावात येऊन शिकार करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.