तिसऱ्यांदा विजेतेपद ;वर्षा रामटेके ठरल्या पुन्हा "स्ट्रॉंग वुमन् ऑफ इंडिया.

तिसऱ्यांदा विजेतेपद ;वर्षा रामटेके ठरल्या पुन्हा "स्ट्रॉंग वुमन् ऑफ इंडिया.


एस.के.24 तास


चंद्रपूर : सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्पधॉ जिंकून येथील पॉवर लिफ्टर सौ. वर्षा रामटेके यांनी तिसऱ्यांदा  स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया  हा खिताब जिंकून जिल्ह्याला बहूमान मिळवून दिला आहे.दि.7,8,9 एप्रिल ला अग्रसेन भवन नागपूर येथे आयोजीत राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पधैत अतुलनीय कसब दाखवून वर्षा रामटेके तिसऱ्यांदा स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया ठरल्या आहेत.सदर स्पर्धा पावर लिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित करण्यात आली होती.

वर्षा रामटेके यांनी या पुर्वी सोनिपत(हरियाणा) व रायपूर येथे दोनदा हा अत्यन्त मानाचा खिताब जिंकला आहे.गत महिन्यात चंद्रपूर येथील स्पर्धेत स्ट्रॉंग वुमन् ऑफ चंद्रपूर हा खिताब जिंकला होता हे विशेष चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डाँ.बंडू रामटेके यांच्या वर्षा रामटेके अर्धांगिनी आहेत.वर्षा रामटेके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !