तालुका कांग्रेस कमिटी मुल तर्फे भारतरत्न महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
एस.के.24 तास
मुल : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात तालुका कांग्रेस,महिला कांग्रेस,शहर कांग्रेस, युवक कांग्रेस,ओबीसी कांग्रेस,किसान कांग्रेसच्या वतीने घेण्यात आला. कांग्रेसचे सक्रिय नेते,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोशसिंह रावत यांचे हस्ते डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष,तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनूरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व बाजार समिती संचालक,राकेश रत्नावार,उपसभापती संदीप कारमवार,शहर अध्यक्ष सुनील शेरकी, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते बंदुभाऊ गुरनुले, ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, संचालक किशोर घडसे, शांताराम कामडे, गणेश रणदिवे, माजी नगर सेविका ललिता फुलझेले,विनोद कामडे,माजी उपसरपंच गौरव पुपरेड्डीवार, संचालक विवेक मुत्यलवार, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, अनवर शेख, ज्योत्स्ना पेंदोर,सुनील शेलेकर,आकाश वाकुडकर,लक्ष्मी लाडवे,अल्का कामडे,श्यामला बेलसरे, संगीता भोयर, चंद्रकांत चतारे,यांचेसह कांग्रेसचे शहर व ग्रामीण विभागातील अनेक कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले.