एल्गार ॲकॅडमी च्या विध्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत सुयश.
एस.के.24 तास
मुल : नुकतीच SSC GD ची परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये ग्रामीण क्षेत्रात विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन करणारी एल्गार अकॅडमी मधील सहा विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
गरीब व होतकरू मुलांसाठी एल्गार अकॅडमी ही अत्यंत कमी फी मध्ये स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन देणारी मूल मधील पहिलीच अकॅडमी आहे.
अकॅडमी मधून पहिल्याच प्रयत्नांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतीक मोहूर्ले,साहिल रामटेके,सपना लोणबले,सोहन गुरनुले,अंकित गुडलावार,मोहन चनकापुरे हे आहेत.उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी एल्गार अकॅडमी चे संचालक डॉ.कल्याण कुमार मार्गदर्शक, पारोमिता गोस्वामी,किशोर राऊत,नागेश चलाख यांना दिले.मैदानी चाचणीची तयारीही एल्गार अकॅडमी मार्फत सुरू असल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.