सँटेलाइट लोखंडी रिंग सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे मिळाली.



सँटेलाइट लोखंडी रिंग सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे मिळाली.


★ रिंग बघण्यासाठी लोकांची गर्दी.


★ पोलिसांनी रिंग ताब्यात घेतली.


एस.के.24 तास


चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावी रात्री 10 वाजता च्या सुमारास सँटेलाइटची 8 ते 10 फुटाची लोखंडी रिंग पडल्याने एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार ही रिंग पडताच लोकांची एकच गर्दी झाल्याने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.


आज सायंकाळी 7.45 ते 8 वाजताच्या सुमारास आकाशातून उल्का वर्षाव झाल्यासारखे रांगेत लाल गोळे जमिनीच्या दिशेने आले.आकाशात लाल गोळे बघून लोकांनी कुतूहलाने त्याकडे बघितले. चंद्रपूर खगोल अभ्यासक डॉ.योगेश दूधपाचारे यांना गोंडपिपरी,धाबा भागात ही घटना झाल्याचे सांगण्यात आले. मात्र तिथे फक्त लाल गोळे दिसल्याचे लोकांनी सांगितले. मात्र रात्री 10 वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे एक मोठी लोखंडी रिंग पडली. ही रिंग आकाशातून कोसळलेल्या सँटेलाइटची असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाशातून पडलेली ही रिंग बघण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार सिदेवाही पोलिस ठाण्यात रिंग जमा करण्यात आली आहे. 8 ते 10 फूट मिटरची ही रिंग आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !