वर्षा रामटेके ठरल्या "Strong woman of Chandrapur..2022"

वर्षा रामटेके ठरल्या "Strong woman of Chandrapur..2022"


एस.के.24 तास


चंद्रपूर : चंद्रपूर डिस्ट्रिक पॉवरलिफ्टिंग असोशिएशन तर्फे आयोजीत जिल्हा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये वर्षा रामटेके यांनी पुन्हा एकदा "Strong woman of Chandrapur. 2022" हा बहुमान पटकावला आहे.


 चंद्रपूर डिस्ट्रिक पॉवरलिफ्टिंग असोशिएशन तर्फे 8 मार्च ला  डि.आर.सी.हेल्थ क्लब येथे ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.या आधी वर्षा रामटेके यांनी "Superstring woman of India" हा बहुमान पटकावला असून दोन सुवर्णपदके पटकावली आहेत.जागतिक महिला दिनाचे पर्वावर वर्षा रामटेके यांनी महिलांचे श्रेष्टत्व सिद्ध केले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

              

वर्षा रामटेके जिल्हा वैद्यकीय महाविद्यालातील जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.बंडू रामटेके यांच्या पत्नी असून डॉ.बंडू रामटेके यांनाही नुकताच राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्काराने आरोग्य मंत्री व सांस्कृतीक मंत्री यांनी मुंबईत सत्कारित केले आहे हे विशेष.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !