अखेर युवा स्वाभिमान पक्षाच्या दणक्याने प्रकल्पग्रस्त कामगारांना सी.एस.टी.पी.एस,चंद्रपुर कामावर सामावून घेण्यास तयार.
एस.के.24 तास
राजुरा : सविस्तर वृत्त असे की, मौजा चांदसुर्ला, ता. जि.चंद्रपूर येथील रोजगारापासून वंचित असलेल्या प्रकल्पग्रस्त कामगारांन संदर्भात त्यांना कामावर सामावून घेण्याकरिता समस्त कामगारांनी मागील दोन वर्षापासून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र येथील कंपनी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन सुद्धा समस्त कामगारांच्या मागण्या कंपनी प्रशासनाने पूर्ण न केल्यामुळे अखेर त्रस्त कामगारांनी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्याकडे धाव घेतली. कामगारांची समस्या ऐकताच तात्काळ श्री. सुरजभाऊ ठाकरे दिनांक:- १८/०२/२०२२ रोजी कंपनी प्रशासनासह इतर संबंधित विभागांमध्ये निवेदने देऊन सातत्याने पत्रव्यवहार केला. इतक्यावरच न थांबता दिनांक:- ५/०३/२०२२ रोजी श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर येथे कामगारांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेऊन कामगारांना न्याय न मिळाल्यास अथवा त्यांना कामावर सामावून घेतल्यास चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रानी समस्त प्रकल्पग्रस्त कामगारांचा जमिनी त्यांना परत करून द्याव्यात व जमिनीच्या मोबदल्यात कंपनीने दिलेले ५,००,०००/- लक्ष रुपये आम्ही कंपनीला परत करू! असे ठणकावून सांगत दिनांक:- १०/०३/२०२२ रोजी चंद्रपूर येथील मेजर गेट ताडोबा रोड समोर समस्त प्रकल्पग्रस्त कामगारांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा देताचं कंपनी प्रशासनाने तात्काळ रोजगारापासून वंचित प्रकल्पग्रस्त कामगारांन संदर्भात आज दिनांक:- ९/०३/२०२२ रोजी दुपारी- ४:३० वाजता सी एस टी पी एस प्रशासन, चंद्रपूर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कामगारांच्या समक्ष कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता १५ दिवसांचा वेळ कंपनीने मागितल्यामुळे सहकार्याची भूमिका ठेवत दिनांक:- १०/०३/२०२२ रोजी करण्यात येणारे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
जर दि. ९/०३/२०२२ आजपासून येत्या १५ दिवसानंतर दि. २५/०३/२०२२ पर्यंत सदर प्रकल्पग्रस्त कामगारांना कामावर सामावून न घेतल्यास दिनांक :- २६/०३/२०२२ रोजी स्तळ- मेजर गेट ताडोबा रोड, चंद्रपूर समोर परत आमरण उपोषण करण्यात येईल हे निश्चित.! असे सदर मिटिंग मध्ये कंपनी प्रशासनाला ठणकावून सांगण्यात आले.या बैठकीमध्ये समस्त कामगारांसह चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथील अधिकारी वर्ग व कर्मचारी,कंत्राटदार,तथा युवा स्वाभिमान पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख श्री.राहुल चव्हाण,माजी पंचायत समिती सदस्य श्री.सुभाष गौरकार व गावकरी उपस्थित होते.