ओबीसीचे चक्का जाम आंदोलन.
★ तालुक्यातुन हजारो ओबीसी बांधवाची उपस्थिति.
★ आरक्षण मागनीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर.
एस.के.24 तास
सावली : ( लोकमत दुधे ) अनेक वर्षांपासुन ओबीसींच्या मागण्या व समस्या प्रलंबित आहेत. केंद्र सरकार सातत्याने ओबीसी समाजावर अन्याय करीत आहे. ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा घाट घालत आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना नाकारुन ओबीसींना संविधानिक हक्क व अधिकारांपासुन वंचित ठेवत आहे. म्हणुन सर्व राजकिय पक्षांनी ओबिसी आरक्षण लागु व्हावे, करीता सर्वानुमते आवाज उठविला पाहिजे, असे ओबीसी नेते कविंद्र रोहणकर यांनी म्हटले.
सदर चक्का जाम आंदोलन आज (दि. ७) ला दुपारी १२.०० वाजता व्याहाड खुर्द ता.सावली येथील गडचिरोली चंद्रपूर हाईवे वर घोषणांच्या गर्जना करीत हजारो ओबीसींच्या उपस्थितीत करण्यात आले.
ओबीसी समाजाची जातनिहाय्य जनगणना करण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेण्यात येवु नये. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे. ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कारलशिप देण्यात यावी तसेच मागील दोन वर्षापासुन मॅट्रीकपुर्व स्कारलशिप देण्यात आलेली नाही ती त्वरीत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. राज्य सरकारने त्वरीत वर्ग ३ व ४ पदाची पदभरती लवकरात लवकर घेण्यात यावी. बिगर आदिवासी वनपट्ट्यासाठी असलेली तीन पिढ्याची अट त्वरीत रद्द करण्यात यावी. केंद्रात ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात यावे. एस.सी. व एस. टी. शेतकऱ्याप्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शासकीय योजना त्वरीत सुरू करण्यात याव्या. केंद्रसरकारने क्रिमीलेअरची मर्यादा वाढविण्यात यावी, इत्यादी ओबीसी समाजाच्या मागण्या घेवुन आंदोलन करण्यात येत आहे.आंदोलनानंतर स्थानिक प्रशासनामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, पंचायतराज मंत्री, अर्थमंत्री, विरोधी पक्ष नेते आदींना निवेदन देण्यात आले.यावेळी ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नेते मा अविनाश भाऊ पाल, मा निलमताई सुरमवार मा अर्जुन भोयर डॉ.मर्लावार तुलसीदास भुरसे,गिरीश चीमुरकर,नितिन भाऊ पाल दादाजी किनेकर,आशिष मंबत्तूनवार ,हिवराज शेरकी, ईश्वर गंडाटे किशोर वाकुडकर,जितू सोनटक्के, दिवाकर गेडाम, विशाल करंडे,मनोहर कुकडे, दिलीप ठीकरे राजेंद्र भोयर, कालिदास चापले, अरविंद निकेसर, मारोती गावतुरे, नामदेव भोयर, मोतीराम चिमुरकर, मोहन चनावार, कीनेकर सर मुकेश भूर्से, निलेश मशाखेत्री,दीपक जवादे,शोभाताई बाबनवाडे, प्रतीभाताई बोबाटे, छायाताई चकबनडवार, शरदाताई गुरूनुले, गणपत कोठारे, विनोद धोटे,केशव भरडकर, राजू टोंगे, अनिल मशाखेत्री, अरविंद भरडकर, मुक्तेश्वर थोरक, संदीप जूनघरे, पुरुषोत्तम बोरकुटे, सुनील मुंघाटे , आकाश बोबाटे, विशाल करंडे, विशाल मलोडे,गोलू कांबळे, शुभम वाढनकर, अरुण जुनघरे, रवि झरकर, चंदू गुरुनुले, ज्ञानेश भोयर, लोकेश भोयर प्रेम तीवाडे, द्रोणाचार्य वाडगुरे, विनोद कोक्कवार विलास चौधरी, प्रभाकर चौधरीप्रज्वल भोयर,युगांत भोयर,असे जिल्हाभरातून हजारो ओबीसी सहभागी झाले होते.