अधिकारी म्हणतात जनता समोर येत नसेल तर आम्ही नेमके करावे तरी काय ?
★ बोथली आरोग्य केंद्र अंतर्गत बोगस डॉक्टराचा सुळसुळात.
★ आरोग्याच्या नावावर गरीब जनतेची लूट.
★ अधिकारी पाहू लागले जनतेच्या तक्रारिची वाट.
एस.के.24 तास
सावली : (लोकमत दुधे) तालुक्यातील बोथली आरोग्य केंद्रा अंतर्गत येणा ऱ्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनचा धुमाकुळ सुरु आहे या संदर्भात सदर प्रतिनिधिनी आरोग्य अधिका ऱ्याशि संपर्क साधला असता या भागात बोगस डॉक्टर बनावट आरोग्य सेवा पुरउन ग्रामीण जनतेच्या आरोग्यशी खेळ सुरु केला असल्याची सप्टोक्ति देत जनता समोर येत नसेल तर आम्ही काय करावे असे सांगण्यात येत आहे आरोग्या संदर्भात अशी गंभीर समश्या सुरु असताना मात्र आरोग्य अधिकारी जनतेच्या तक्रारी वाट पाहतात या बाबत शंका व्यक्त केलि जात आहे यावरून मुळातच या प्रसंगी आरोग्य अधिकारी गंभीर नसल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे बोगस डाक्टराचे फावले जात असून बोगस आरोग्य सेवेतुन ग्रामीण जनते ची आर्थिक लूट होताना दिसुन येत आहे.
ग्रामीण जनतेचे आरोग्य निट राहावे म्हणून गाव तिथे आरोग्य सेवेचि निर्मिति करण्यात आली मात्र अपु ऱ्या आरोग्य सेवेमुळे ग्रामीण आरोग्य सेवेला ग्रहण लागल्याचे दिसुन येत आहे कुठे आरोग्य अधिकारी तर कुठे औष धाचा तुटवडा अशी तोडकी आरोग्यसेवा तालुक्यात सुरु असल्याने योग्य उपचारा अभावि ग्रामीण जनतेला खाजगी रुग्णालयाकडे घाव घेण्याची वेळ निर्माण होत आहे याचा फायदा घेऊन तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरानी आपले बस्तान मांडून बोगस आरोग्य सेवा सुरु केल्याचा सपाटा दिसुन येत आहे त्यामुळे बोगस आरोग्य सेवेला जनता मात्र बळी पळून आर्थिक नुकसान करुण घेत आहेत त्यामुळे स्थानिक आरोग्य सेवेचे अधिकारी अश्या गंभीर दुर्लक्ष करुण जनतेच्या तक्रारी वाट पाहत असतील तर सदर बाबिकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे.
१८ हजार ५०० लोकसंख्या असलेल्या बोथली आरोग्य विभागा अंतर्गत १८ गावांचा समावेश असून या भागात बोगस डाक्टरांचा सुळसुळात असून बोगस डॉक्टर आपली आरोग्य सेवा पुरविताना दिसुन येत आहे तर काहिनि आपले गावाताच बस्तान मांडून आरोग्य सेवा पुरविन्याचा सपाटा सुरु केला आहे त्यामधे काही बोगस डॉक्टर क्यान्सर सारख्या गंभीर आजारावर उपाय म्हणून १० ते १२ हजार रु लूटमारी करीत असल्याचे बोलले जात आहे सोभतच साधारण आजारावर तीन सुया टोचुन आणि मुठभर गोळ्या देऊन गरीब जनतेची लूट केल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे पाहाटेलाच असे बोगस डॉक्टर विन्चवाचे बिराड पाठीवर घेऊन आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या बोथली ; हेटी ; पांडरसराड ; मुंड़ाळा ; हिरापूर अश्या अनेक गावात फिरताना दिसतात तेव्हा अश्या आरोग्याच्या गंभीर बाबिकडे कुणी वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे तेव्हाच आरोग्याच्या नावावर गरीब जनतेची होणारी लूट आणि बोगस आरोग्य सेवेवर लगाम लावल्या जाईल.