निखिल सुरमवार यांच्या नेतृत्वात व्याहाड खुर्द विविध सेवा सहकारी संस्था वर शेतकरी परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय.
★ १३ जागेवर शेतकरी प्यानलची मुसडी.
★ विरोधी पॅनल केवळ ६१ मतावर सामाधानी.
एस.के.24 तास
सावली : ( लोकमत दुधे ) तालुक्यातील व्यहाड खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था र.न. ८९५ साठी व्याहड खुर्द येथे आज झालेल्या निवडणुकीत सावली कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे विध्यमान संचालक निखिल नरेश सुरमवार यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला असून सर्व १३ जागांवर शेतकरी परिवर्तन पॅनलने विजय मिळविला आहे.
सावली बाजार समिती चे संचालक निखिल सुरमवार यांनी १९५ मतांनी दणदणीत विजय संपादन केला असून त्यांच्या गटाचे सर्व संचालक निवडून आले आहेत.
सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटातून विध्यमान अध्यक्ष दिपक वासुदेव जवादे यांनी ३३० पैकी सर्वाधिक २६०मते घेवून दणदणीत विजय मिळवीला तर केशव भरडकर यांना २५८ मते, मारोती बाबनवाडे यांना २५७ मते, देवेन्द्र टोंगे यांना २५०मते, रामचंद्र ठाकूर यांना २४४ मते, लिंगु शेंडे यांना २३८ मते , उमाकांत सहारे यांना २३६ मते, ईश्वर ठुनेकार यांना २३३ मते प्राप्त झाली.
अनुसुचित जाती /जमाती गटातून ओमप्रकाश ढोलने (अविरोध), भटक्या जमाती गटातून हरी ठाकरे यांना २५६ मते, ई. मा. व. मधुन निखिल सुरमवार यांना २५६ मते, महिला राखीव मधून प्रेमीला संदोकार यांना २३२ लताबाई रामटेके यांना २२४ मते घेऊन विरोधी पॅनल चा १९५ मतांनी दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत विरोधी पॅनल चे विजय उरकुडे यांना फक्त ८६मते, विलास नागोसे यांना ७४ मते जीवन नवघडे यांना ७५ मते भगवान अभारे यांना ६१ मते , देविदास टेकाम यांना ६३ मते तर ताईबाई दहेलकर यांना १५७ मते मिळाली . विशेष म्हणजे मागील ग्राम पंचायत निवडणुकीत दोन वेळा व सोसायटी निवडणुकीत दोन वेळा उरकुडे, नागोसे व नवघडे याना दारुण पराभव पतकरावा लागला.