पोलीस निरीक्षक श्री.आशिषजी बोरकर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी झाले मंत्रमुग्ध. ★ महात्मा फुले वाचनालय सावली ठरत आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विदेचे माहेरघर.



पोलीस निरीक्षक श्री.आशिषजी बोरकर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी झाले मंत्रमुग्ध.


★ महात्मा फुले वाचनालय सावली ठरत आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विदेचे माहेरघर.


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास


सावली : सावली तालुक्यातील शहरामधील सामजिक बांधिलकी जोपासून लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेली महात्मा फुले वाचनालय अखेर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विदेचे माहेरघर ठरत आहे. आज अनेक विद्यार्थी याच वाचनालयातुन शासकीय सेवेत रुजू झाले आहे. तसेच तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी चा टॉपर याच वाचनालयातून जवळपास चार वर्षे येत आहे. दररोज सकाळी ७.०० वाजता पासून रात्री ११.०० वाजता पर्यंत विद्यार्थी अभ्यास करत असतात. 


आज सावली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.बोरकर साहेब यांचे मार्गदर्शन पार पडले. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून दिसत होते व एक नवी ऊर्जा घेऊन विद्यार्थी बाहेर पडले. यावेळी ठाणेदार साहेबांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व विदेची आराध्य दैवत क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प मालार्पण करून मार्गदर्शनाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला ज्ञानजोती फॉउंडेशनचे संचालक श्री दिनकर मोहूर्ले,श्री अतुलजी लेनगुरे,श्री संजय कावळे,श्री देवराव मोहूर्ले,चौकेश प्रधाने,सुरज गुरनुले,रवी वाढई,विक्रांत कावळे,सूरज आवळे, महेश मांदळे,महेश गुरनुले,सुमित लेनगुरे,सुमित लेनगुरे,शुभम सोनूले,प्रवीण चौधरी,दिपाली फुलभोगे,पूर्वा प्रधाने,कौतुका मोहूर्ले,धनश्री प्रधाने, आमिशा प्रधाने व अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन निराशा गुरनुले यांनी केले.


             यावेळी पोलीस निरीक्षक श्री आशिष जी बोरकर यांनी मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षेच्या तयारीस सुरवात करताना आपले बुद्धि कौशल्य, क्षमता व आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ याचे गणित परीक्षार्थीला प्रथम सोडवावे लागते. एकदा निश्चय पक्का केला की अभ्यासाचे नियोजन करावे. असे नियोजन करतानी छोटे नियोजन, मध्यम नियोजन, मोठे नियोजन अशी सर्वसाधारण वर्गवारी करावी. छोटे नियोजन हे किमान सहा महिन्याचे असावे, मध्यम नियोजन हे किमान एक वर्षाचे असावे तर मोठे नियोजन हे  किमान तीन वर्षाचे असावे. बऱ्याच वेळा असे नियोजन न करता परीक्षार्थी फक्त समोर असलेली परीक्षा विचारात घेवून दोन ते सहा महिन्याचे नियोजन करतात. बाजारात उपलब्ध असलेली दोन ते तीन पुस्तके विकत घेवून वाचतात. अश्या नियोजनाचा शेवट शेवटी अपयशात होतो. वास्तविक स्पर्धा परीक्षा तयारी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने करणे आवश्यक असते. एकदा की सहा महिने,एक वर्ष व तीन वर्षाचे नियोजन केले की त्या प्रमाणे परीक्षार्थीला यशाकडे हळुवार मार्गक्रमण करून यशस्वी होता येते. काय वाचावे ,किती वाचावे व कोठून वाचावे ही त्रीसूत्री एकदा परीक्षार्थीला की त्याचे पर्यावसन स्पर्धा परीक्षा मार्फत निवडी मध्ये होते.


 स्पर्धा परीक्षा हे सरकारी नोकरी मिळवण्याचे एक साधन असून दरवर्षी साधारणपणे महाराष्ट्रात दहा लक्ष विध्यार्थी आपले नशीब विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अजमावत असतात. ग्रामीण भागातील विध्यार्थी हा गुणवत्ता असूनही उचित मार्गदर्शना अभावी या स्पर्धेत मागे पडतो हे आता लपून राहिले नाही. स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व संधी तसेच बदलत जाणारा अभ्यासक्रम या बाबतचा परामर्श या चिंतनात घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्पर्धा परीक्षा हे एक आव्हान आहे आणि ते पेलायचे असेल तर योग्य मार्गदर्शन,अचूक तयारी व त्याला कष्टाची जोड या शिवाय पर्याय नाही. 


 स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? अनेकांना अनेकदा हेच माहिती नसते अथवा बऱ्याच वेळा अनेकांचा हाच मोठा गैरसमज असतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC. तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की शासन मग ते राज्य शासन असो अथवा केंद्र शासन रिक्त पदे आणि गरजे अनुसार पदभरती करत असत. आता ही पदभरती करायची कशी ? तर त्यासाठीच सर्वप्रथम वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांवर त्या त्या विभागाद्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात  दिली जाते.  या जाहिरातीत पात्रतेच्या सर्व अटी आणि सूचना दिलेल्या असतात. या सूचनांचे पालन करून अर्ज मागविले जातात. आता अनेकजण या पदासाठी इच्छुक असतात मग त्या  सर्व उमेदवारांमधून त्या त्या पदाकरिता योग्य उमेदवार निवडायचे कसे? त्यासाठीच जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात. आता प्रत्येक पदाकरिता या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप वेगवेगळे असते जसे की गृह खात्यात जी  पोलीस भरती केली जाते त्या पदासाठी उमेदवार  शारीरिक स्वरूपात देखील परिपूर्ण असायला हवा मग अशा पदांसाठी लेखी परीक्षे सोबतच शारीरिक गुणवत्ता चाचणी सुद्धा घेतली जाते! 


     अश्या अनेक विषयांवर त्यांनी प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !