भाजपा महिला आघाड़ी तर्फे अंगणवाडी सेविका, मदतनिस व आशा वर्कर महिलांचा सन्मान.
★ नगर सेविका नीलम ताई सुरमवार याची संकल्पना.
★ महिला सन्मान स्तुत्य उपक्रमाचा सर्वत्र अभिनदन.
एस.के.24 तास
सावली : ( लोकमत दुधे ) जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उदारी ...या शुभासिता प्रमाने माता सावित्रीचा आदर्श घेऊन आजची स्त्री पुरुषयाच्या बरोबरिने विविध शेत्रात वाटचाल करायला लागली आहे त्यामुळे अश्या कर्तापगार महिलांचा सन्मान करने काळाची गरज आहे महिलांची ही विविध शेत्रात झालेली गरुड़ झेप पाहता भाजपाच्या धळाळीच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा नवनियुक्त विद्यमान नगरसेविका नीलम ताई सुरमवार यांच्या संकल्पनेतून महिलांचा सन्मान समारंभ नुकताच पार पडला पत्रकार भवनाच्या आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे खा.अशोक नेते महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा अल्काताई आत्राम, जि.प सदस्य संजय.गजपुरे, योगीता डबले,मनिषा चिमुरकर,जेष्ठ नेत्या शोभाताई बोगावार.आदी मान्यवर यावेळी उपस्थित होत्या महिला सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने सावली शहर महिला आघाडीच्या सदस्यांना महिला जिल्हा अध्यक्षाच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रधान करण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष गुड्डी सहारे, संगिता उत्तुरवार, स्नेहा आकुलवार, वनिता मोहुर्ले,रुकसाना शेख,मीना.मोहुर्ले, वनिता गदेकार, मोनिका. शिंदे, सरिता वाघ, अश्विनी गणविर, सिंधु गेडाम, सिंधु मराठे,मालती सोनुले, आदी सावली शहर.महिला भगिनींना नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता उत्तुरवार,संचालन गुड्डी सहारे तर आभार नगरसेविका शारदा.गुरुनले यांनी केले..
कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्री,माता रमाई, मा जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला मार्लापण करून करण्यात आली. सावली भाजप महिला आघाडीच्या या महिला सन्मान समारंभाबाबत सर्वांचे कौतुक केले जात असुन. कर्तबगार महिलाचा सन्मान वेळोवेळी व्हावा ,भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा नगरसेविका मा .निलम ताई सुरमवार यांच्या स्तुत्य उपक्रमा बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.