जि.प.उच्च प्राथ शाळा व मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन संस्थेच्या वतीने आंबेशिवणी गावात जागतिक महिला दिन साजरा.


फाऊंडेशन संस्थेच्या वतीने आंबेशिवणी गावात जागतिक महिला दिन साजरा.



एस.के.24 तास



गडचिरोली : जि.प.उच्च प्राथ शाळा व मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेशिवणी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.हा कार्यक्रम शाळेतील मुख्याध्यापक श्री सुरेश बांबोळकर सर व मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. श्री. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक देवेंद्र हिरापुरे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी येथे 'जागतिक महिला दिवस'विविध स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला.


जागतिक महिला दिवस निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये संगीत खुर्ची व रिल रेस,भाषण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला महिला व विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला होता.विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले.


ही स्पर्धा घेण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे आजची महिला कोणत्याही कार्यात मागे नाही.आजची महिला सक्षम व्हावी स्वतचे निर्णय स्वतः घ्यावी.या कार्यक्रमात शेख मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महिलांनी आजच्या आधुनिक युगात स्वतःपासून बदल केले पाहिजे कारण पुढची पिढी कशी घडवायची हि स्त्रीच्याच हातात आहे. महीला ही अखंड प्रेमाचे व प्रेरणेचे स्त्रोत असून स्वतः खंबीर राहून जीवनात येणाऱ्या संकटाचा जिद्दीने सामना करावा.ज्यांनी स्त्री शक्तीचा पुरेपूर वापर केला त्या महान स्त्री शक्तींनी इतिहासात स्वतः चे नाव घडविले अशा थोर महीलाचा आदर्श ठेवून स्वतः सक्षम बनावे.


या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून मा.शेख मॅडम, बल्लमवार मॅडम, आरोग्य सेविका वर्षा वाटे मॅडम व आसमवार मॅडम, धारा सोरते आशावर्कर, मुख्या. बांबोळकर सर, सागर आत्राम सर, देवाजी बावणे जिवन कौशल्य शिक्षक, बालपंचायत मंत्रिमडळ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.आंबेशिवणी येथील शाळेत असणारे मंत्रिमंडळनी  कार्यक्रमाची आखणी केली, कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक बांबोळकर सर, प्रास्ताविक बलमवार मॅडम,आणि मार्गदर्शन शेख मॅडम,आभार प्रदर्शन सागर आत्राम सर यांनी केले.


 जागतिक महिला दिवस हा कार्यक्रम शाळेतील मंत्रिमंडळच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम  पार पडला. तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तेथील शिक्षक सागर आत्राम सर,शेख मॅडम आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे जिवन कौशल्य शिक्षक देवाजी बावणे यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !