महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने आझाद मैदान मुंबई येते साखळी उपोषण सुरु.
एस.के.24 तास
मुबंई : आपल्या विविध मागण्या साठी आज दिनांक 05 मार्च 2022 ला रोज शनिवार पासून आझाद मैदान मुंबई येते साखळी उपोषण सुरु.आज दिनांक 5 मार्च 2022 रोज शनिवार पासून आझाद मैदान मुंबई येते महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या कडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा तसेच लोकप्रतिनिधी यांनि सुद्धा शासनाकडे पाठापुरवठा करून दखल घेत नसल्यामुळे साखळी उपोषण करीत आहेत.
1) दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी निघालेले आधीसुचणे मध्ये बदल करून हंगामी क्षेत्र कर्मचारी यांचा 50% कोटा पूर्ववत करून आरोग्य सेवक पदाची शैक्षणिक पात्रता 12 वी पास कोणत्याही शाखेतून करण्यात यावी.
2) 28 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या परीक्षेतील उमेदवारामधूनच आरोग्य सेवक पुरुष 50% यांची 100% पद भरती करण्यात यावी.
3) आरोग्य सेवेतील सर्व पदे तात्काळ भरावीत. जिल्हा परिषद 2019 मध्ये निघालेली बहुुद्देशिय आरोग्य कर्मचारी 50% यांची परीक्षा त्वरित घेण्यात यावी.
4) 90 मार्क्स असलेल्या पात्र उमेदवाराचे समयोजन करण्यात यावे.
5) हंगामी क्षेत्र कर्मचारी पु. 50% कोट्यातील बहुुद्देशिय आरोग्य कर्मचारी पदासाठी बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांवर कायदेशीर कर्यवाही करण्यात यावी.
6) बहुुद्देशिय आरोग्य कर्मचारी 50% कोट्यातील समांतर आरक्षातील EWS,माजी सैनिक अंशकालीन,खेडाळू प्रकल्पग्रस्त,भूकंपग्रस्त ,ही पदे तात्काळ भरावीत.
7) 12 जानेवारी 2022 च्या हंगामी क्षेत्र कर्मचारी दस्तावेज पडताळणी परिपत्रकाची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत आदी मागण्या साठी महाराष्ट्रातील विविध संघटनानी पाठींबा जाहीर केला आहे.