सामाजिक कार्यकर्त्यांची, मुख्यमंत्रयाकडे निवेदनाद्वारे मागणी.
★ आंदोलन करण्याचा ईशारा.
राजेंद्र वाढई - कार्यकारी संपादक एस.के.24 तास
मुल : चंद्रपुर जिल्ह्यातील विविध मागण्या घेवून मूल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ,मारोती शेंडे,नंदू बारस्कर व नागरीकानी,उपविभागीय अधिकारी मूल यांचे मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे माणयाचं निवेदन दिले त्यात प्रामुख्याने,वन जमीनीवरील अतिक्रमण धारकाना वनाधिकार अधिनियमा नूसार पटे देण्याची कारवाई करावी,
विमूक्त भटक्या जमाती यशवंतराव चव्हाण घरकुल योजना,विशेषः मच्छीमार धीवर,केवट या जातीना शासन निर्णय सन 2014 व सुधारित निर्णय सन 2019 नुसार चंद्रपुर जिल्ह्यात लागू करा,ग्राम पंचायत मार्फतीने नागरिकांना रेती वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात यावे, घरकुल योजनेतील शहरी,ग्रामीण भेद भाव न करता समान निधी दयावे, निराधाराना दर महा त्यांचे खात्यावर पेन्शन जमा करावे इत्यादी मागण्याचे निवेदन देवून,मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलन करण्या चा ईशारा दिला आहे. यात सौ अर्चना उईके ग्राम पंचायत सदस्य मारोडा,भादूरणा येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाबाई बोरूले,कविता मेश्राम,सविता मेश्राम, अरूणा शेंडे,यशवंत जराते,चंद्रशेखर शेंडे,विकास रनदिवे, कामराज कडूकार, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.