निशुल्क नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर.
एस.के.24 तास
चामोर्शी : नेत्र हे मनुष्याचे खूप महत्त्वाचे अंग आहे .ग्रामीण भागातील जनतेला तालुक्यात येणे शक्य होत नाही किंवा खाजगी रुग्णालयात उपचार करून घेणे परवडत नाही. त्यामुळे उपचार करीत नाही .पर्याय कित्येक लोकांना मोतिबिंदू मुळे अंधत्व आला आहे. कोणाला मोतीबिंदू मुळे अंधत्व येऊ नये हा सुंदर जग पाहिले पाहिजे.यासाठी 3एप्रिल2022 रोजी सकाळी 10.30 वा.स्थळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मारोडा येथे होप फाउंडेशन सिरोंचा,समता फाउंडेशन मुंबई, ग्रामपंचायत मारोडा, जय शिवराय सार्वजनिक युवा मंडळ मारोडा व राष्ट्रीय सेवा योजना केवळ रामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केला आहे या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मा.श्री.अतुलभाऊ गण्यारपवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी,अनिल झुरे सरपंच ग्रामपंचायत मारोडा,डॉ.नागदेवते सर,पुरुषोत्तम घ्या सर,डॉ. पवन नाईक सर,डॉ. नागेश मायदेशी सर,समीर मोहुर्ले, अजय चौधरी ,रोशन कोहळे,बालाजी सेलोटे तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच गावकरी मंडळी यांनी केले आहे.