मुल तालुक्यातील बेंबाळ येथील सौ.ताईबाई दिवाकर डंकरवार " राज्य स्तरीय महिला पुरस्काराने " पुणे येथे सन्मानित.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास
चंद्रपूर : दिनांक, 30 मार्च 2022 बुधवार ला जे.पी.नाईक सेंटर एकलव्य पाँलिटेक्निक कॉलेज कोथरूड,पुणे येथे अंतरा संस्था आयोजित "राज्य स्तरीय महिला पुरस्कार " वितरण करण्यात आले.
कौटुंबिक जबाबदारी सोबत पशुपालनाचे विशेष कौशल्य बाळगणाऱ्या गुणवंत महिलांच्या कार्याची दखल घेऊन अंतरा संस्थेच्या वतीने मुल तालुक्यातील बेंबाळ येथील सौ,ताईबाई दिवाकर डंकरवार यांना राज्य स्तरीय महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मुलाखती मध्ये सौ,ताईबाई यांनी दैनंदिन जीवनातील संपूर्ण घडामोडीची तसेच शेळ्या मेंढ्याचा कळप ( लांग ) कसे सांभाळावे.बिऱ्हाडाचे स्तलंतर कसे करावे आणि पशूंचे संगोपन,निगा,काळजी कशी घ्यावी या सविस्तर माहिती दिली.
चंद्रपूर जिल्ह्या ,मुल तालुक्यातील बेंबाळ येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय सौ,ताईबाई दिवाकर डंकरवार या अशिक्षित आहेत. कुरमार/धनगर समाजाचा पारंपरिक मेंढ्या व शेळ्या राखण्याचा व्यवसाय मागील ४२ वर्षा पासून ते सक्षमपणे सांभाळत आहेत.
पशूंची विशेष काळजी घेताना कळपात असलेले शेळ्या- मेंढ्या आजाराने किंवा इतर कारणाने जे चालु शकत नाही त्यांना व्यवस्थित जागेवर ठेवून चारा आणने,चराईला नेणे,दिवसभर देखरेख करने.त्याच बरोबर लहान पिले स्वत: पाणी पित नाही त्यामुळे त्याना उन्हाळ्यात सतत पाणी पाजावे लागते.लहान पिले खुप नाजुक असतात त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.
शेळ्या मेंढ्यांचा कळप सांभाळण्याचे एक कौशल्य आहे. लहान पिल्यांना एक ते दोन महिने केव्हा केव्हा तीन महिने पर्यंत त्यांचा सांभाळ करणे ,त्याचप्रमाणे कळपात असणारे आजारी जनावरांचे उपचार करणे हे कौशल्याचे काम आहे.
कुरमार समाज आपल्या मेंढ्या- शेळ्या गावात ठेवत नाही ते बाराही महीने कळपासोबत बाहेर राहतात त्यामुळे काही स्त्रिया सुद्धा मेंढपाळासोबत बाहेर जातात.मी लहान पणापासुन बिऱ्हाडावर राहुन आहे त्यामुळे कशाचीही भिती वाटत नाही.कधी कधी बिऱ्हाडावर एकतेच राहावे लागते तेही जंगलात. एक ते दोन किलो मिटर वरुन पाणी आणावे लागते. लांगावर असलेले जनावरे व लहान पिलांचे काळजी घेणे,चारा आणणे व लावणे,जाळी ठोकणे आजारी जनावराना चराईला नेणे त्याचबरोबर पावसाळ्यात जानवराची ,स्वत:ची व कुटुंबाची विशेष काळ्जी घ्यावी लागते. स्त्रियावर खुप मोठी जबाबदारी असते मेंढ्यांच्या कळपावर कोल्हे,लांडगे,वाघ हल्ला करतात, कधीकधी अचानक वादळ, पाऊस आला तर काय करावे? हे सर्व तिच स्त्रि करु शकते जी पहीले पासुन करत येत आहे. सामाजिक सुरक्षा नसतांना सुद्धा लांगावर राहाणे.जेव्हा मेंढ्या लंगडत असतात तेव्हा व घरचा माणुस आजार असतो त्यावेळी मेंढ्या राखायला जावे लागते.ही कामे सर्व स्त्रिया करु शकत नाही. आताच्या स्त्रिया तर अशी कामे करायला पाहत नाही.
तुम्ही सोबत असल्याचा कुटुंबाला फायदा कसा मिळतो ? आम्ही लांगावर (बिराडावर) असल्यामुळे लहान पिलांची सोय होते,त्याच बरोबर आजारी असलेल्या जानवरांची योग्य देखभाल होते व जनावराना लागणाऱ्या चाऱ्याची सोय होते. त्याचप्रमाणे कोटा झाडणे,स्वयंपाक करणे,भांडे धुणे,कपडे धुणे ही कामे आम्ही केल्यामुळे पुरुषाचे खुप वेळ वाचते.पुरुषाला कोठे कामा निमित्ताने बाहेर जावे लागले तर आम्ही मेंढ्या राखायला जातो. आम्ही लांगावर आसल्यावर एका मजुराचा खर्च वाचतो. कोठे दुसरी कडे स्थलांतर व्हायचे असेल यामध्ये आमची भुमिका पण महत्वाची असते. तसे पाहिले तर आम्ही एका माणसाचे काम करतो. आम्ही लागांवर नाही गेलो तर एक मजुर ठेवावा लागतो त्याचा एका दिवसाचा खर्च ४०० रुपये आहे. एकाद्या वेळेस आम्ही लांगावर नाही गेले किंवा वेळेवर मजुर नाही मिळाले तर बिराडावर असलेले लहान पिल्यांना लांडगे, कोल्हे, बिबट ,कुत्रे मारतात किंवा काही लोक पिल्यांना चोरुन नेतात.याच्यामुळे खुप नुकसान होते.
हे काम करण्यामागे कोणती प्रेरणा मिळते ?
पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे आधीपासुन घरी मेंढ्या- शेळ्या असल्यामुळे वयाच्या ५ व्या वर्षापासून बाबांसोबत लांगावर जात होत्या.
त्यानंतर वयाच्या१३ व्या वर्षी लग्न झाले. सासुरवाडी बेंबाळ होते तिथे पण हेच काम असल्यामुळे तेथे पण मी हेच काम करत गेले यामध्ये सर्वात मोठा वाटा माझ्या पतीचे सुद्धा आहे. कारण लग्न झाल्यापासुन आतापर्यंत मी जे काही शिकवले ते त्यानीच शिकविले.
हे काम करतांना मानसिक समाधान वाटते का ?
असा प्रश्न विचारले असता तर त्यांनी सांगितले की,जे काही काम करत आहे त्यामध्ये कुटुंबातील सदस्य मदत करतात लहान पणापासून तर आतापर्यंत मेंढ्या- शेळ्या सोबत राहणे सवय झाली आहे. हे पारंपारीक काम असल्यामुळे आणि आम्ही जनावराचे संरक्षण व सवर्धन करीत आहे यामुळे सर्वात मोठा मानसिक समाधान वाटतो.
मला प्राप्त असलेले कौशल्य व ज्ञान मी माझ्या सुनेला शिकवले आहे. आता मी नसतांना सुद्धा ती पशूंची व्यवस्थित काळजी घेते.
हे कौशल्य कोणाला शिकवण्याची गरज आहे ? ज्यांच्या घरी मेंढ्या- शेळ्या आहेत त्या घरातील सर्वया स्त्रियानी शिकण्याची गरज आहे. जनावराची सोय कसे करतात ? पालन पोषण कसे करावे? चारा कोणता लागतो ? जाळी, जनावरासाठी कुपंन कसे करतात ? जनावराला काय झाले हे जेव्हा प्रत्यक्ष करतील तेव्हा ते जनावराची भावना समजून घेतील.
सौ,ताईबाई दिवाकर डंकरवार आपल्या मुलाखती मधून सांगितले.हा पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण गावात तालुक्यात, जिल्ह्यात कौतुक व अभिनंदन केले जात आहे.