तालुका कांग्रेस कमिटी मुल येथे डिजिटल सदस्य नोंदणी बाबत आढावा बैठक.
एस.के.24 तास
मुल : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशानुसार डिजिटल सदस्य नोंदणी बाबतची आढावा बैठक मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात कांग्रेस नेते ,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जी.प.चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. राज्यात डिजिटल सदस्य नोंदणीचे कार्य सुरू करण्यात आले आहे शहरी व ग्रामीण भागात कांग्रेस सदस्य अधिकाधिक नोंदणी करुन कांग्रेस पक्षाच्या बळकटी कारणासाठी कांग्रेस पदाधिकारी व युवक आणि महिला कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे असे मार्गदर्शन संतोषसिंह रावत यांनी केले बळकटीकरणासाठी महाराष्ट्र या सदस्य नोंदणीला गती मिळावी याकरिता विचार विनिमय करण्यासाठी या तातडीच्या बैठकीचे आयोजन मुल येथे करण्यात आले. यावेळी मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनूरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व बाजार समिती संचालक राकेश रत्नावार, उपसभापती संदीप कारमवार,शहर अध्यक्ष सुनील शेरकी, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार,जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते बंदुभाऊ गुरनुले, सरपंच रवींद्र कामडी, संचालक किशोर घडसे, धनराज रामटेके, अतुल बुरांडे, गणेश खोब्रागडे, युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, जिल्हा सरचिटणीस सुमित पा.आरेकर, माजी नगरसेविका ललिता फुलझेले, प्रदीप कामडे, पंकज पुल्लावार, अरविंद बोरूले यांचेसह कांग्रेसचे शहर व ग्रामीण विभागातील अनेक कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.