साधारण आजरावर मुटभर गोळ्या तीन सुया टोचुन ग्रामीण गरीब जनतेच्या आरोग्याशी खेळ.
◆ आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.
◆ बोथली अंतर्गत बोगस डॉक्टरांकडून गरीब जनतेची आर्थिक लयलूट.
◆ बोथली आरोग्य केंद्र अंतर्गत १८ गावाचा समावेश.
एस.के.24 तास
सावली : (लोकमत दुधे) अपु ऱ्या आरोग्य सेवेमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरानी आपले बस्तान मांडून बोगस आरोग्य सेवा सुरु केलि आहे या निमित्याने गरीब जनतेची मोठी आर्थिक लयलूट बोगस डॉक्टरा कडून केली जात आहे.
मात्र अश्या गंभीर बाबिकडे स्थानिक बोथली आरोग्य सेवे सह तालुका आरोग्य आणि जिल्हा आरोग्य सेवेचे दुर्लक्ष होताना दिसुन येत आहे बोथली आरोग्य विभागा अंतर्गत १८ गावांचा समावेश असून १८,५00 अशी लोकसंख्या असलेल्या बोथली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ गावाचा समावेश आहे,मात्र सदर.आरोग्य केंद्रांतर्गत काही डाक्टर गावातच दुकानदारी थाटुन क्यांनसर सारख्या गंभीर आजारावर.बोगस आरोग्य सेवा.पुरवुन.१५ ते २० हजार रुपये,उपचाराच्या नावावर.गरीब जनतेची लयलुट करणे सुरू आहे. तर काही बोगस डॉक्टर सावली मुख्यालयातिल औषधालयाशी संपर्क साधुन विचवाच बि-हाड पाठीवर घेऊन ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविताना दिसतात त्यांच्या माध्यमातून साधारण आजारावर.मुळभर.गोळ्या, तीन सुया टोचुन.गरीब जनतेची मोठी आर्थिक लयलुट करताना दिसुन येत आहेत,अशा गंभीर बाबीकडे तालुका सह जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.होताना दिसत आहे त्यामुळे अशा बोगस डाक्टरांचे फावले जात असुन ते मालामाल होताना दिसतात,या परिसरात फिरणारे बोगस डॉक्टर आम्हाला आरोग्य सेवा पुरविण्याची परवानगी आहे,आमची न्यायालयात मामला न्यायप्ररविस्ट आहे आम्ही ईलेक्टो - होमो पॅथॉलॉजी चालवु शकतो अशी बतावणी करुन,सोबतच आमच्या वर.कोणी कारवाई करू शकत नाही,आम्ही मेडीकल प्राक्टीशियन.आहोत असे सांगत बनावट आणि बोगस आरोग्य सेवा.पुरवुण ग्रामीण जनतेची आर्थिक लयलुट करण्याचा सपाट सुरू केला आहे.अशा.बोगस डॉक्टरांना खरच आरोग्य सेवेची परवानगी आहे काय ? मग नसेल तर.तालुका आरोग्य सेवा व.जिल्हा आरोग्य सेवा गडीगप्प का ? गरीब जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असताना,आणि आर्थिक लयलुट असताना अशा बोगस डॉक्टरावर.आरोग्य. सेवेची कारवाई.थंडबस्यात असल्याचा दिसून येत आहे,भविष्यात अशा.बोगस डाक्टाराकडुन.आरोग्य सेवा.पुरविताना.काही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जिम्मेदार कोण ? असा प्रश्न ऐरणीवर असताना बोगस आरोग्य सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरावर कारवाई करणार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,गेली दोन वर्षापासुन कोरोनाची महामारी सुरू असताना सुध्दा बनावट,बोगस,नान.रजिस्टर डॉक्टरांची आरोग्य सेवा ग्रामीण भागात सुरू असून गरीब जनतेची आर्थिक लयलुट सुरू असताना तालुका सह जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे, याचा अर्थ.ग्रामीण भागातील.आरोग्य सेवा. अपुरी पडत आहे की काय त्यामुळे ग्रामीण भागात परप्रांतीय जिल्हा बोगस डॉक्टरांचे बस्तान बसले असून बे परवाना आरोग्य सेवा पुरविली जात आहे यात शंका नाही,आजच्या घडीला.बदलत्या वातावरणामुळे आणि दोन वर्षाताल कोरोना महामारीमुळे ग्रामीण जिवन अत्ताव्यस्त होत असताना तालुका आरोग्य विभागासह जिल्हा आरोग्य चे दुर्लक्ष होत असताना मानवी आरोग्याकडे.लक्ष देणार कोण त्यामुळेच बोगस आरोग्य सेवा पुरविली जात असुन गरीब जनतेची लयलूट होताना दिसते अशा गंभीर बाबीकडे तालुका सह जिल्हा आरोग्य सेवेने लक्ष वेधून तालुक्यातील.बोगस डॉक्टरावर कारवाई करण्यात यावी सोबतच बोथली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सुरू असलेल्या बोगस डॉक्टरांवर त्वरित कारवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरतआहे.
बोथली आरोग्य केंद्रा अंतर्गत बोगस डॉक्टरराचा धुमाकुळ सुरु असताना कुणी ग्रामीण जनता समोर येत नाही यात शंका आहे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या फार्माणा नुसार बोथली परिसरातील बोगस डॉक्टरावर कार्यवाही केली जाईल यात जनतेचे सहकार्य आवश्यक आहे.
- मा.डॉ.विवेक यमजालवार - वैद्यकीय अधिकारी बोथली