कांतापेठ येथे वृद्धाची विहिरीत पडून आत्महत्या.
राजेंद्र वाढई - कार्यकारी संपादक एस.के.24 तास
मुल : आज दिनांक,21/03/2022 सोमवार ला अंदाजे दुपारी 2.00 वा.च्या दरम्यान मृतकाच्या शेतीला लागून भिमराव कुंभारे यांच्या मालकीच्या विहिरी मध्ये रामदास बापूजी गावतुरे वय,60 वर्ष रा.कांतापेठ यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन मुल अंतर्गत चिरोली चौकीत माहिती देण्यात आली.घटनास्थळी चौकी इंचार्ज पठाण साहेब,जावून शव बाहेर काढून सामान्य रुग्णालय मुल येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले.पुढील तपास पोलीस करीत आहेत.