"त्या ” तरूणीचा अत्याचार करून खून,सुरज ठाकरे व मृतक तरुणीच्या नातेवाईकांचा पत्रपरिषदेत आरोप.
★ सखोल व नि:पक्ष तपास करण्याची मागणी.
एस.के.24 तास
चंद्रपूर : शहरालगतच्या चोराळा गावालगत मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. पडोली पोलिसांनी चारचाकी वाहनाच्या धडकेत तरूणीचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. मात्र, युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे मृतक तरुणीच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषद घेऊन मुलीवर सामूहिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पडोली पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित प्रियकराच्या बयानावर एकतर्फी विश्वास ठेवून तपास केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सर्व दृष्टिकोनातून तपास करण्यात यावा व मृतक तरुणीच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
चोराळा गावाजवळ प्रियकरास भेटण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तरुणीच्या गुप्तांगातून रक्तस्राव झाल्याने हा अपघात नसून सामूहिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी व काही राजकीय पक्षांनी केला होता. मात्र पडोली पोलिसांनी खून नसून अपघात असल्याचे जाहिर करून चालकाला अटक केल्याचे सांगितले. त्यामुळे आज युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे व मृतक तरुणीच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत हा अपघात नसून सामूहिक अत्याचार केल्यानंतर खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पडोली पोलिसांनी अपघाताच्या दृष्टिकोनातून तपास केला असून अत्याचार व खून चा दृष्टिकोनातून तपास केला नसल्यामुळे सर्व दृष्टिकोनातून तपास करावा अशी मागणी लावून धरण्यात आली. पत्रकार परिषदेला मृतक तरुणीचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.