निखिल वाढई यांच्या प्रसंगावधानाने वाचले तीन जीव - स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखविली तत्परता.
एस.के.24 तास
मुल : चित्तथरारक! आत्महत्या करण्यासाठी रेल्वे फाटकावर उभा होता तरुण,भरधाव वेगाने रेल्वे येताच रेल्वे गाडीच्या समोर आत्महत्या करण्यासाठी घेतली धाव ;युवा संघटना चे अध्यक्ष,निखिल वाढई ने मुलगा आई वडील या तिघांचे वाचवले जीव.मुल गोंदिया बल्लारशा रेल्वे महामार्गावर मालवाहतूक रेल्वे 7.00 वाजता सुमारास जात असताना माल वाहतूक रेल्वेच्या समोर आत्महत्या करण्यासाठी अद्यान व्यक्ती ने प्रयत्न केला.भरधाव वेगाने मालवाहतूक रेल्वे येताच अज्ञात व्यक्तीने रेल्वेगाडी कडे धाव घेतले होते आणि त्या सोबतच त्याची आई वडील पण धाव घेत होते हे सर्व दृश्य रेल्वे फाटका वरील उभे असलेले सर्व नागरिकांनी पहिले तिथेच थांबून असलेले युवा क्रांति संघटनेचे अध्यक्ष, निखिल वाढई यांनी हे दृश्य पाहताच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या अज्ञात व्यक्तीच्या पाठोपाठ धाव घेतली त्यांना रेल्वे गाडीच्या समोरून रुळावरुन बाजूला केलं आणि त्याचे प्राण वाचवले सोबतच त्याच्या आई वडीलाचे.मूल रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला आहे. यावेळी निखिल वाढई यांचा तत्परतेमुळे आई वडील आणि मुलाचे प्राण वाचले.
ज्या पद्धतीने प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीचे प्राण वाचवले त्याबद्दल सर्व नागरिक निखिल वाढई यांच्या कार्याचं कौतुक करत आहेत.