कलापथकाद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनजागृती.
एस.के.24 तास
सावली : शासनाच्या द्विवर्षपुर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,चंद्रपूरद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर कलापथक गावागावात जनजागृती करण्यात येत आहे.विशेष म्हणजे बोलीभाषेतील संवाद, पोवाडे,नकला,अभिनय आदींच्या माध्यमातून गावक-यांना शासकीय योजनांची माहिती मिळत असल्याने सावली तालुक्यात व्याहाड खुर्द, दाबगाव,सावली,खेडी या गावांत सावली येथील पंचायत समिती सभापती,विजयभाऊ कोरेवार तसेच सावली नगरपंचायतचे नगराध्यक्षा,नगरसेवक उपस्थित होते शासनाच्या विविध योजनांचा जागर करण्यात आला आहे.उशिरा रात्रीपर्यंत चालणा-या या कार्यक्रमांना गावकरी प्रतिसाद देत असून शासकीय योजनांची माहिती जाणून घेत आहे.
कलापथकांच्या सादरीकरणातून प्रामुख्याने आघाडी सरकारची दोन वर्षातील कामगिरी,सरकारने घेतलेले विविध कल्याणकारी निर्णय,शेतकरी, शेतमजुर,सामान्य नागरीक,विद्यार्थी आदींसाठी राबविण्यात येणा-या योजनांची माहिती देण्यात येते. गावक-यांनी कलापथकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांचे कलावंत ग्रुपप्रमुख संजय मेकर्तीवार.शरीफ मानकर,मयूर राशेट्टिवार,आशिक गुरनूले,हिमांशु ताटकलवार,अतुल रायपुरे,अविनाश कथले, मनेश तोडासे,गायत्री चौधरी,प्रतिमा चौधरी उपस्थित होते.