होळीच्या पुर्वसंध्येवर.सावली पोलिसाची मोठी कार्यवाही.
★ १ लाख ८४ हजाराचा मुद्देमाल जप्त.
★ सावली पोलीसाची कारवाई.
★ अवैद्य दारू विक्रेत्याचे धाबे दनानाले .
एस.के.24 तास
सावली : ( लोकमत दुधे ) आगामी होळी उत्सव लक्षात घेऊन पो.स्टे सावली येथे अवैध दारू वाहतूक व विक्री प्रतिबंध करण्या करीता पथक तयार केले असून आज दि.16/03/21 रोजी महाराष्ट्र दारूबंदी अंतर्गत केलेली कारवाई पुढीलप्रमाणे अप क्रं 58/22 कलम 6 tv5a,83 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार.गोपनीय माहीतीच्या आधारे वाहतूक शिपाई विशाल दुर्याधन यांच्या सतर्कतेमुळे व्यांकिस बार चे समोर सावली ते गडचिरोली राष्ट्रीय महार्गावरील.वेंकीस बार समोर अवैधरित्या दारुची वाहतूक होताना दिसली,त्याच वेळी सर्तकतेने 90 ml रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे 28 बॉक्स की. अं.84,000 रू आणि एक जुनी वापरती वोलकँवागन कंपनीची car क्रं MH.43 AF 4440 की.अं.1,00,000 रू असा एकूण 1,84,000 रू.किमतीचा मुद्देमाल. जप्त करण्यात आला.
आरोपी,वैभव भक्तादास ठाकरे वय,24 वर्ष व सचिन अरविंद वडपल्लिवार वय 22 वर्ष. दोन्ही रां.मोहझरी जि गडचिरोली
यांनी अवैध रित्या दारु गडचिरोली जिल्ह्यातील नेताना सापडले.यातील आरोपी हे नमूद घ.ता.वेळी व ठिकाणी त्यांचे ताब्यातील नमूद मिळालेल्या वाहनाने 90ml रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे 28 बॉक्स गडचिरोली कडे अवैध रित्या वाहतूक करतांना मिळून आले.वरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई मा.उपविभागीय पोलिस अधिकारी इंगळे साहेब,सावली ठाणेदार,आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनात पो.उ.नि.चीचघरे,पो.ह.वा,दिलीप मोहूर्ले ,नापोका केवल तुरे,स्वप्नील दुर्योधन,धीरज चव्हाण,श्रीकांत वाढई यांनी केली