शेतकरी कल्याण योजना राबविणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील पहीली बँक - ना. विजय वडेट्टीवार
★ मुल येथे पार पडला भव्य महीला मेळावा.
नितेश मँकलवार ! उपसंपादक ! एस.के.24 तास
मुल : शेतकरी कल्याण निधी योजनेतंर्गत दुर्धर रोगग्रस्त शेतकऱ्यांना उपचाराकरीता अर्थसहाय्य करणारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील पहीली बँक असुन राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानातंर्गत बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या महीलांना ३% व्याजाचा परतावा करण्याचा धाडसी निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत राज्याचे मंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.
स्थानिक दुर्गा मंदीर परीसरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल शाखेच्या वतीने आयोजीत महीला बचत गटाच्या मार्गदर्शन मेळाव्यात ना. वडेट्टीवार बोलत होते. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मेळाव्यास बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, विभागीय कर्ज समिती अध्यक्ष राजेश रघाताटे, संचालक संदीप गड्डमवार, डाँ. विजय देवतळे, प्रा. ललित मोटघरे, डाँ. अनिल वाढई, प्रकाश बंसोड, संजय तोटावार, जिल्हा महीला काँग्रेसच्या अध्यक्षा चिञा डांगे, बल्लारपुरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, सदस्य अब्दुल करीम, बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखील गांगरेड्डीवार, महीला तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार, शहर अध्य सुनिल शेरकी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, व्यवस्थापक एम.व्ही.पोटे, संजय खनके आदी मान्यवर उपस्थित होते.
साविञीबाई फुले, विर बाबुराव शेडमाके आणि कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि दिपप्रज्वलन करून ना. विजय वडेट्टीवार यांनी मेळाव्याचे उदघाटन केले. निधी जंबुलवार हीच्या श्रीगणेश वंदन नृत्यानंतर गृहीणी महीला बचत गटाने स्वागतगीत सादर केले. यावेळी बचत गटाच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्ये केल्याबद्दल मूल येथील प्रगती महीला बचत गट, गृहीणी महीला बचत गट, साविञी महीला बचत गट, मारोडा येथील रमाबाई बचत गट, सिंतळा येथील अनुसयामाता महीला बचत गट, शारदा महीला बचत गट राजोली, सरस्वती महीला बचत गट, रमाबाई महीला बचत गट गोवर्धन, जय संतोषी माँ महीला बचत गट नांदगांव, गोंडवाना महीला बचत गट चिरोली आणि वाल्मीकी महीला बचत गट चिरोली अश्या अकरा गटांच्या अध्यक्षा आणि सचिव ह्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवुन ना. विजय वडेट्टीवार यांनी सन्मान केला. शेतकरी कल्याण निधी अंतर्गत श्रीमती सुमिञा शंकर मोहुर्ले (विरई) राकेश गंगाधर भुपतवार (मारोडा) केशव विस्तारी महाजनवार (ताडाळा) श्रीमती शालुबाई गौतम गणवीर (भेजगांव) देवीदास मोतीराम सातपुते (दुगाळा माल) शैलेश रमेश देशट्टीवार (मूल) सुनिता बाजीराव वाढई (आगडी) ईश्वर काशीनाथ कुडेकर (बाबराळा) दिपक यशवंत दुधे (चकदुगाळा) मारोती बांगरे (बोंडाळा) वासुदेव गोपाळ मोहुर्ले (कोसंबी) आणि लचमन्ना पोशट्टी म्यँकलवाल (येरगांव) विलास जानकीराम रायपुरे (येरगांव) आणि मूला येथील सागर देवराव जराते ह्यांना स्व. राजीव गांधी स्वयंरोजगार योजनेतंर्गत अर्थसहाय्याचे धनादेश वितरीत करण्यात आले. मेळाव्यात सहभागी झालेल्या महीला बचत गटांपैकी वैष्णवी महीला बचत गट मूल, कल्याणी महीला बचत गट सिंतळा, करीश्मा महीला बचत गट हळदी, शारदा महीला बचत गट राजोली, सरस्वाती महीला बचत गट राजोली, शिवशक्ती महीला बचत गट गोवर्धन, राजलक्ष्मी महीला बचत गट नांदगांव, पायल महीला बचत गट सुशी आणि राणी दुर्गावती महीला बचत गट नलेश्वर ह्यांना ३ टक्के व्याजाच्या परताव्याची रक्कम धनादेशाव्दारे देण्याण आली. मेळाव्यात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्ये करीत असलेल्या मूल येथील मानवता विकास व संवर्धन संस्थेला मिळालेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचा चषक आणि प्रशस्तीपञ पालकमंञी ना. विजय वडेट्टीवार ह्यांचे हस्ते संस्थेच्या पदाधिका-यांनी स्विकारला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर ह्यांनी विद्यमान अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि समस्त संचालक वृंदाचे मार्गदर्शनात उत्तम कार्य करीत असल्याचे आवर्जुन सांगीतले. मेळाव्याचे संचालन संजय पडोळे आणि उपस्थितांचे आभार गुरू गुरनुले यांनी मानले. मेळावा यशस्वीतेसाठी व्यवस्थापक मंगल बुरांडे आणि विभागीय अधिकारी प्रशांत तोटावार यांचे मार्गदर्शनात बचत गट जिल्हा समन्वयक अशोक पवार, शंकर लोढे, शाखा व्यवस्थापक मधुकर लेनगुरे (मूल) अनिल सिरस्कर (चिरोली) संतोष रेड्डीवार (चिरोली) किशोर वैरागडे (नांदगांव) निरीक्षक विनोद वेटे, हेमंत भोपये, राजेश कागदेलवार, उज्वला पुप्पलवार, माधुरी मांडवगडे, सुनिल मंगर, केदारनाथ कोटगले, अशोक येरमे आदींनी परीश्रम घेतले. मेळाव्याला तालुक्यातील महीला बचत गटाच्या हजारो महीला आणि पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्याच्या उदघाटनापुर्वी वेगवेगळ्या महीला बचत गटाच्या सदस्यांनी गीत, नृत्य आणि नकलांचे सादरीकरण करून हम किसीसे कम नही असा नारा दिला. हे विशेष.
कोरोना योध्दांचा सत्कार : -
दुर्गा मंदीर परीसरात पार पडलेल्या महीला मेळाव्यात श्री माँ दुर्गा मंदीर समितीच्या वतीने ना. विजय वडेट्टीवार ह्यांचे हस्ते उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर,ठाणेदार सतिशसिंह राजपुत, वैद्यकीय अधिकारी डाँ.वसीम राजा,आरोग्य समन्वयक,रितेश भोयर,सोशल मिडीया प्रतिनिधी कुमुदीनी भोयर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी देवीदास म्हशाखेञी ह्यांचा कोरोना योध्दा म्हणुन सत्कार करण्यात आला.
विजय वडेट्टीवार ह्यांचा सत्कार
श्री माँ दुर्गा मंदीर परीसरात सामाजिक सभागृह निर्माण होण्यासाठी पालकमंञी ना. विजय वडेट्टीवार ह्यांनी निधीची उपलब्धता करून दिल्याबद्दल श्री माँ दुर्गा मंदीर समितीच्या वतीने अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि पदाधिका-यांनी ना. विजय वडेट्टीवार ह्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मोठा हार घालुन आभारा दाखल सत्कार केला.