जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या मुल तालुका अध्यक्ष (ग्रामीण) पदी,राजेंद्र वाढई यांची निवड.
★ मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास
मुल : मा.सोनियाजी गांधी यांच्या मान्यतेनुसार मा.खासदार श्री, ताम्रध्वज शाहू यांच्या आदेशानुसार मा.आमदार श्री,नानाभाऊ पटोले साहेब प्रदेशाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात श्री, भानुदासजी माळी साहेब,प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचवण्यासाठी ओबीसी विभाग कार्यरत आहे.
मा.उमाकांत धांडे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य,मा.गुरुदास जी चौधरी प्रदेश सचिव,ओबीसी विभाग काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष श्री,नंदकिशोर वाढई यांनी नियुक्ती करून पत्र दिले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या मुल तालुका अध्यक्ष (ग्रामीण)पदी,राजेंद्र वाढई यांची निवड करण्यात आली.
मा.सोनियाजीच्या दृष्टिकोन व त्यांच्या उद्दिष्टाचे महत्व ओळखून मा.आमदार नानाभाऊ पटोले साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली भानुदास माळी साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली
सुयोग्य काम करून काँग्रेस पक्षाची प्रतिमा जनसामान्यात उज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन,बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर चे अध्यक्ष मा. संतोषसिंग रावत यांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.