कोंडेखल येथील वाघाच्या हल्ल्यात बैल ठार.
सुरेश कन्नमवार !मुख्य संपादक!एस.के.24 तास!
सावली : उपवनक्षेत्राअंतर्गत कोंडेखल या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने बैलावर हल्ला करून ठार केले. ही घटना रविवारी दुपारी 1.00.वा च्या सुमारास घडली. कोंडेखल येथील शेतकरी,देवराव कोलते हे नेहमी प्रमाणे आपल्या बैलांना चराई करिता जंगलात घेऊन गेले होते. तेव्हा त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने देवराव कोलते यांच्या बैलावर हल्ला करून जागीच ठार केले.त्या वेळेस कोलते यांच्यासह अनेक शेतकरी हजर होते. त्यांनी आरडाओरडा केल्याने वाघाने तिथून धूम ठोकली. दरम्यान या घटनेची माहिती व्याहाड खुर्द उपवन क्षेत्राचे अधिकारी वनपाल सूर्यवंशी यांना देण्यात आली. वन विभागाने घटनास्थळी गाठून पंचनामा केले. गेल्या काही दिवसापासून या भागात बिबट,वाघ,यांचा वावर आहे.
त्यामुळे वन्य प्राण्यांचे बंदोबस्त करण्याची मागणी कोंडेखल येथील नागरिक करीत आहेत.