एस.के.24 तास
मुबंई : ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्न चे हार्ट अटक ने थायलंड मधे दुःखद निधन झाले असुन जागतिक क्रिकेट विश्वातील सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला महान लेग स्पिनर शेन वॉर्न काळाच्या पडद्याआड गेला आहे.
शेन वॉर्नच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला जोरदार हादरा बसला असुन आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम रचणाऱ्या तसेच खाजगी आयुष्यात नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या शेन वॉर्न ह्याचे अचानक निधन झाल्याने क्रिकेट प्रेमींना धक्का बसला आहे.
आपल्या कारकीर्दीत तब्बल 708 कसोटी बळी घेणाऱ्या शेन वॉर्न ह्याने अनेक महान फलंदाजांची भंबेरी उडविली होती मात्र तो सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता होता व सचिन तेंडुलकर आपल्या स्वप्नात येतो व स्वप्नातही आपल्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवितो असे वक्तव्य शेन वॉर्न ह्याने केले होते हे विशेष.