2 किलो गांजा रामनगर पोलिसांच्या ताब्यात - आरोपी अटकेत.
★ चिकन सेंटर च्या नावाआड चालायचा गांजा विक्रीचा व्यवसाय.
एस.के.24 तास
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आल्यानंतर अवैध दारू विक्रेत्यांनी आपला मोर्चा अंमली पदार्थांकडे वळविला असुन जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. तेलंगणा सिमा जिल्ह्याला लागुन असुन जवळपास तीन तालुक्यातून थेट तेलंगणा सिमेत प्रवेश करता येतो ह्याचाच गैरफायदा घेत सीमेपलीकडून जिल्ह्यात अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे.
ह्याच अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप ख. धोबे, पोलीस स्टेशन रामनगर ह्यांना 9 मार्च रोजी खबरी द्वारे प्राप्त गुप्त माहितीनुसार कन्हैया नारायन कुंडू वय ४२ वर्ष धंदा चिकन सेंटर रा. प्रगती नगर बल्हारशा बायपास रोड चंद्रपुर आपले राहते घरी अवैधरित्या गांजा बाळगुन विक्री करीत आहे असे कळले. प्राप्त सूचनेवरून सपोनी संदिप धोबे ह्यांनी पंच, डि.बी. पथक, फोटोग्राफर यांचेसह कन्हैय्या कुंडू ह्याचे राहते घरी धाड घातली असता घराच्या पहिल्या खोली मध्येच खाटे खाली एका हिरव्या रंगाच्या प्लॉस्टीक पिशवी ज्यावर PRANALI-७७ असे लिहलेले असुन त्या प्लास्टिकच्या पिशवीत गांजा वनस्पती वजन सुमारे २.०७२ किलो ग्रॅम असा एकुण १०,०००/- रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद इसमा विरुद्ध पोलीस स्टेशन, रामनगर येथे २०९/२०२२ कलम २० (बी), (बी) २२ एनडीपीएस अँक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोनि राजेश मुळे, सपोनि संदिप धोबे, सापोनी हर्षल अकरे, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. रजनीकांत पुट्ठाचार, पोहवा / पेतरस सिडाम, नापोशि/पुरुषोत्तम चिकाटे, नापोशि, किशारे वैरागडे, विनोद यादव, आनंद खरात, पांडुरंग वाघमोडे, निलेश मुडे, सतिष अवथरे, लालु यादव, विकास जुमनाके, संदिप कामडी, हिरालाल गुप्ता, भावना रामटेके, बुल्टी साखरे यांनी केली आहे.