नाफेड व एफ.सी.आय तर्फे चना खरेदी सुरू. ★ चना नोंदणी 16 फेब्रुवारीपासून तर खरेदीचा कालावधी 1 मार्च ते 29 मे पर्यंत.

1 minute read

नाफेड व एफ.सी.आय तर्फे चना खरेदी सुरू.


★ चना नोंदणी 16 फेब्रुवारीपासून तर खरेदीचा कालावधी 1 मार्च ते 29 मे पर्यंत.


एस.के.24 तास


चंद्रपूर : पणन हंगाम 2021-22 मध्ये शासनाने आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत चनाचे दर 5230 रु. प्रति क्विंटल प्रमाणे मंजूर केले आहे. चना खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाने नाफेड, एफसीआयची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली असून नाफेड व एफसीआयच्या वतीने राज्यामध्ये पणन महासंघामार्फत चना खरेदी सुरू करावयाची आहे. चना नोंदणीचा कालावधी 16 फेब्रुवारीपासून तर चना खरेदीचा कालावधी 1 मार्च ते 29 मे 2022 पर्यंत असणार आहे.



राज्य शासनाने नोंदणी व खरेदीची अंतिम मुदत निश्चित केली आहे. जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये खरेदी केंद्र सुरू नाही,अशा तालुक्यांना जोडण्यात आले आहे. त्यामध्ये वरोरा व भद्रावती तालुक्यांमध्ये वरोरा खरेदी केंद्र,ब्रह्मपुरी,सिंदेवाही व नागभीड तालुक्यामध्ये चिमूर खरेदी केंद्र,कोरपना व जीवती तालुक्यामध्ये गडचांदूर खरेदी केंद्र,तर गोंडपिपरी, बल्लारपूर, पोंभुर्णा, सावली व मुल तालुक्यामध्ये राजुरा खरेदी केंद्राला जोडण्यात आले आहे.


दिलेल्या खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी आपले आधार कार्ड, वोटिंग कार्ड,शेतीचा सातबारा, बँक पासबुक इत्यादी संपूर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी व दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी आपला चना विक्री करण्यास खरेदी केंद्रावर घेऊन यावे,असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए.आर.गोगिरवार यांनी केले आहे.


0

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !