येरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पुजा करून शिव जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

येरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पुजा करून  शिव जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


एस.के.24 तास


मुल : राजे शिव वीर जिजाई सामाजिक मंच येरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती जन्मत्सोव सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.किरण पा.नागापुरे, माणुसकीची दोरी या उपक्रमाचे जनक,युवा चे प्रेरणास्थान चंद्रपूर व सौ.रेवता रमेश गोहने उपसरपंच ग्रा.प येरगाव तर अध्यक्षस्थानी श्री. प्रदीप पाटील नागपुरे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ येरगाव प्रमुख पाहुणे म्हणून श्री. महादेव पा. नागापुरे अध्यक्ष कुणबी समाज संघटना तथा अध्यक्ष राजे शिव वीर जिजाई सामाजिक मंच येरगाव,श्री.शरद पत्रुजी नागापुरे अध्यक्ष.शा.व्य. स.,श्री. विनोद रामदास नागापुरे अध्यक्ष त. मु. स.,  श्री. सुधीर रामचंद्र नागापुरे  ग्रा. प. सदस्य, सौ. उषा किरण नागापुरे ग्रा. प. सदस्य,सौ.प्रेमिला काशिनाथ मडावी ग्रा.प.सदस्य, सौ.प्रतिभाताई चावरे अंगणवाडी सेविका,श्री.सुधाकर पा .झरकर माजी सरपंच  सौ. नलिनी मोहन नागापुरे  माजी सरपंच उपस्थितित दिप प्रज्वलन करुन छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पुजा करून  शिव जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी शिवाजी महाराजांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकत  सन्मा.श्री.किरण पा. नागापुरे चंद्रपूर यांनी विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले. 


त्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांचे विचार व जिजाऊ घराघरात निर्माण व्हावे असे सांगत  विदयार्थ्यांनी यश कसे संपादन करावे याविषयी मार्गदर्शन केले. व गावात वाचनालय सुरू करा व त्या करिता लागणारा खर्च जेवढं शक्य होईल तेवढं मी स्वतः करेन अशी हमी देत वाचनालय ही युवा पिढी साठी काळाची गरज आहे असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्याचप्रमाणे.यावेळी सौ.प्रेमिला काशिनाथ मडावी ग्रा.प.सदस्य,यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आई हि जिजाऊ मा साहेबा न सारखी असायला हवी,मुलांना वडीलाचाच धाक न दाखवता स्वतःच पण अस्तीव निर्माण करा. आई ची शिस्त कशी असते हे आपल्या घरातून समाजाला दाखवा व जिजाऊ मा साहेबा सारखं शिकवण आपण आपल्या मुलांना द्या व आपण स्वतः  आपल्या मुलं करिता मा साहेब जिजाऊ बना. , श्री.दिपक हरिदास नागपुरे,सौ.प्रतिभाताई चावरे यानी आपले मन व्यक्त करताना मुलांना व्यसनाला दूर सारून चांगल्या कामाला लागा आपले भविष्य चांगले उज्वल करा. स्वतः अभ्यासाची ओढ निर्माण करा.बाप व्यसन करतो म्हणून मुलगा पण व्यसन करायला लागतो.तेव्हा आधी बापाने सगळ्या व्यसनं बंध करायला पाहिजे आणि घरचे व्यसन करणारे लोक व्यसन करणे बंध करतील तर घरचा संसार सुद्धा सुखाने नांदत असतो. असे ते अपले मत व्यक्त केले.


 कार्यक्रमासाठी यावेळी शिवचारित्र्यअभ्यासक श्री. हरिदास धर्माजी नागापुरे. शिवाजी महाराजांच्या जिवन चारित्र्य सांगताना महाराजांनी सर्व धर्मासाठी काम केलेत, सर्व धर्मीय महिलांचा आदर केला. आपल्या काळातील राज्य व राज्यातील लोकांना कुटलाही त्रास होवू नये म्हणून शेतकऱ्याचा कैवारी होवून स्वता झटले व जनता राजा ही कीर्ती मिळवली.असे यांनी आपले मनोगत व्यक्त करत शिवाजी महाराज यांचा पोवाळा म्हणत आपल्या मनोगताला  विराम दिला कार्यक्रमासाठीगावातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मंगल मशाखेत्री यांनी सुत्रसंचालन अंकुश गोहणे आणि आभार श्री.महादेव पा. नागापुरे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजे शिव वीर जिजाई सामाजिक मंच येरगाव सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !