शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी जनतेची माफी मागावी. ★ मुल च्या भाजपच्या कार्यालय समोर कांग्रेस तर्फे जाहीर निषेध.

शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी जनतेची माफी मागावी.

★ मुल च्या भाजपच्या कार्यालय समोर कांग्रेस तर्फे जाहीर निषेध.


एस.के.24 तास


मुल : देशाचे पंतप्रधान, संपूर्ण देशात कोरोना महाराष्ट्र काँग्रेसमुळे वाढला असा आरोप संसदेत केला आहे. केवळ राजकीय द्वेषातून त्यांनी हा आरोप केला आहे. या आरोपामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा व जनतेचा अपमान झाला आहे. त्यामुळे मुल मुल तालुका, मुल शहर, महिला कांग्रेसच्या वतीने कांग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.बुधवार दिनांक ९ फेब्रुवारीला सकाळी ११-३० वाजता भाजपच्या कार्यालयासमोर मुल येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. 


निषेध संदर्भात ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी,राकेश रत्नावार,बंदुभाऊ गुरनुले,शहर अध्यक्ष,सुनील शेरकी,यांनी कोरोना बाबत कोणी पसरविला याबाबत हकीगत सांगून परखड विचार व्यक्त करुन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.आंदोलनात मूल तालुका काँग्रेसचे पदाधिकारी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप कारमवार,ओबीसी प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार,बाजार समिती संचालक राजेंद्र कन्नमवार,संचालक किशोर घडसे,डॉ.पद्माकर लेनगुरे,जेष्ठ कार्यकर्ते बंडूभाऊ गुरनुले,महिला कांग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार,शहर कांग्रेस अध्यक्ष,सुनील शेरकी, गुरु गुरनुले,युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवार,नगर सेवक विनोद कामडे,आदर्श खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, माजी सरपंच सुमित आरेकर, हसन वाढई, उपसरपंच राहुल मुरकुटे,विवेक मुत्यालवार,सुरेश फुलझेले, अतुल गोवर्धन,मनोज ठाकरे,संतोष गावतुरे,अनवर शेख,गणेश रणदिवे, लोकनाथ नर्मलवार,धनराज रामटेके,महिला कांग्रेसच्या संगीता भोयर,माधुरी मंगर,वासुदेव उमरगुंडावार आणि पदाधिकारी, शहर,युवक,महिला काॅंग्रेसचे सर्व पदाधिकारी व सर्व सेलचे अध्यक्ष,पदाधिकारी यांचेसह  जेष्ठ,व युवक कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !