चक्क जोडे घालून महिला वाहकाने वाहिली छत्रपती महाराजांच्या आदरांजली.

चक्क जोडे घालून महिला वाहकाने वाहिली छत्रपती महाराजांच्या आदरांजली.


एस.के.24 तास


चंद्रपूर : महिला वाहकाला फोटो काढणे लक्षात असते मात्र जोडे काढणे लक्षात कसे राहत नाही ? अनेकांना पडलाय प्रश्न.युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संपुर्ण देशभरात महाराजांना अत्यंत सन्मानाने तसेच मनोभावे आदरांजली अर्पण करण्यात येत असताना चंद्रपूर आगारातील एका महिला वाहकाने चक्क पायात जोडे घालुन छत्रपती महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. महिला वाहकाला फोटो काढणे लक्षात असते मात्र जोडे काढणे लक्षात कसे राहत नाही? असा प्रश्न अनेकांना पडला असुन सदर घटनेमुळे रोष निर्माण झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की,चंद्रपूर आगारात शिवजयंती निमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला कर्मचाऱ्यांसह आगर प्रमुख डफले उपस्थितहोते.आगार प्रमुखांनी सर्वप्रथम शिव प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार घातला. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी आदरांजली अर्पण केली.दरम्यान मनीषा गार्गेलवार नामक महिला वाहकाने चक्क पादत्राणे घालून छत्रपती महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.


अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला जोडे घालुन पुष्प अर्पण करणाऱ्या महिला वाहकाचा सर्वत्र निषेध करण्यात येत असुन जाणते अजाणतेपणी मनिषा गर्गेलवार ह्यांनी छत्रपती महाराजांचा अपमान केला असुन त्यांनी आपल्या कृत्याची माफी मागावी अशी जोरदार मागणी होत असुन आगार व्यवस्थापकांच्या उपस्थितीत असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !