मुल तालुक्यातील चिरोली येथे ग्रामसेवकाला जीवे मारण्याची धमकी.

मुल तालुक्यातील चिरोली येथे ग्रामसेवकाला जीवे मारण्याची धमकी.


 एस.के.24 तास


मुल : मुल तालुक्यातील चिरोली येथे दिनांक 14/02/2022 रोजी ग्रामपंचायत चिरोली ला ठीक 12.वा.विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आले होते. सदर ग्रामसभा कोरम पूर्ण झाल्यामुळे मा.अध्यक्ष श्री,भक्तदास कुंभारे यांच्या परवानगीने सभेला सुरूवात करण्यात आली.सदर सभा पूर्ण झाल्यावर मा.अध्यक्षांच्या परवानगी सभा संपली असे जाहीर करण्यात आले.त्यानंतर चिरोली गावातील प्रशांत मुरारी रामटेके यांनी ग्रामविकास अधिकारी,श्री.व्ही.एम.यारेवार यांना इतर विषया बाबत बाचाबाची सुरू केली.आणि तुम्ही गावात जेथे कुठे दिसल्यास तिथे मारू आताच्या आता सभागृहाच्या बाहेर निघा मारून टाकतो आणि जिवे मारण्याची धमकी दिली आहे. व्ही.एम.यारेवार ग्राम विकास अधिकारी यांनी मुल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून सदर प्रशांत मुरारी रामटेके यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून  यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे.

श्री,व्हि.एम.यारेवार,ग्रा.वि.अ.चिरोली यांनी पोलीस स्टेशन मुल येथे तक्रार दिली असुन मा.पोलीस निरीक्षक,साहेब पोलीस स्टेशन,मुल येथे तक्रार दाखल केली असुन सदर तपास मुल पोलीस स्टेशन करित आहेत.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !