मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर संस्थेच्या वतीने मुल तालुक्यातील विविध गावात मॅजिक बस स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर संस्थेच्या वतीने मुल तालुक्यातील विविध गावात  मॅजिक बस स्थापना दिवस साजरा करण्यात आला.


एस.के.24 तास


चंद्रपूर : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री.प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक कु.निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व मुल येथील शाळा मधील मूल तालुक्यात  "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा उपक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे.उपक्रमाचे विषेश म्हणजे हा उपक्रम शाळेत शिक्षकांच्या सहकार्यने राबविला जात आहे. 

विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजविणे, माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे व मुलींचे लग्नाचे वय वाढविणे अशा हेतूने मॅजिक बस संस्था चंद्रपूर जिल्ह्यात काम करीत आहे. मुल  येथे 14 फेब्रुवारी 2022 ला मॅजिक बस स्थापना दिवस  असल्याने या दिवसा निमित्ताने विविध गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात गीत गायन,मैदानी स्पर्धा,शिक्षकांचे तसेच मुलांचे मॅजिक बस कार्याविषयी चे मनोगत  यांचे आयोजन करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात गावातील,शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक तसेच शाळकरी मुलांनी सक्रिय सहभाग घेतला आणि बक्षीस पटकावून घेतले.सुशी,मुल,नलेश्र्वर,दाबगाव , चिरोली,सिंथला,भेजगाव येथील प्रत्येक शाळेत असणारे मंत्रिमंडळनी  कार्यक्रमाची आखणी केली, कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक, आणि मार्गदर्शन हे सर्व मुलांचे शाळा पातळीवर असणाऱ्या मंत्रीमंडळाने केले  त्यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम  पार पडला. तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तेथील सीसी संबोधी गेडाम,  स्वप्नाजा खोब्रागडे, प्राची भूर्से, खोजेंद्र उराडे, योगिता, दामिनी बुरांडे,स्नेहल मोहूर्ले आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे SSO संदेश रामटेके यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !