मुल येथे आगळा वेगळा 'सासू-सून मेळावा डॉ,अभिलाषा गावतुरे यांचा उपक्रम.

मुल येथे आगळा वेगळा 'सासू-सून मेळावा.

डॉ,अभिलाषा गावतुरे यांचा उपक्रम.


नितेश मॅकलवार - उप संपादक एस.के.24 तास


मुल : दिनांक 5 फेब्रुवारी 2022 रोजी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता सौ शशिकला ताई गावतुरे यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त साई मंदिर मुल येथे एक आगळा वेगळा 'सासू-सून'मेळावा कार्यक्रम घेण्यात आला .या सामाजिक कार्यक्रमा च्या निमित्ताने महिलांमध्ये समाज प्रबोधन तसेच सासू सुनेचे व महिला व मुलांचे गमतीदार खेळ घेण्यात आले व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी मंचावर सत्कारमूर्ती सौ,शशिकला ताई गावतुरे,अँड.राजश्री ठाकरे,दयाबाई महाडोळे,निशा मोहुरले,पर्यावरण संवर्धन समितीच्या रत्ना गुरनुले,माधुरी निकूरे,काजलताई मॅकलवार विमलताई धारणे उपस्थित होत्या.



सासू-सून मेळाव्याला संबोधित करताना सौ,शशीकला गावतुरे म्हणाल्या सासू - सून या कुटुंब व्यवस्थेतील दोन प्रमुख व्यक्ती व आधार स्तंभ आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये या संबंधात कटुता आलेली आहे. या दोन व्यक्ती मधील दैनंदिन संबंध  सुधारावा, त्यांच्यातील नाते बळकट व्हावे व परिणामी कौटुंबिक स्वास्थ्य सुधारावे.तसेच घरातील मुलाबाळांच्या संगोपन एका सुदृढ वातावरणात व्हावे यासाठी सासू-सुनांचं नातं एक मैत्रीपूर्ण नातं असायला हवं.अशा वातावरणात फक्त कुटुंब प्रगती करत नाही तर समाज सुद्धा प्रगती करतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

या प्रसंगी बालरोग तज्ञ डॉ,अभिलाषा गावतुरे यांनी मुलांच्या संगोपनात मध्ये, पिढी घडवण्यामध्ये सासू-सुनेचं सौहार्दपुर्ण नातं किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं.या प्रसंगी डॉ,समीर कदम यांनी महिलांना सामाजिक कार्यात सहभागाबद्दल चे महत्व पटवून दिले.कार्यक्रमाचे संचालन सौ,निशा दडमल मोहुर्ले यांनी केले.तर सौ सीमा लोनबले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशासाठी सौ पुनम मोहुर्ले,राकेश मोहुर्ले,सौ कमल मॅकलवा,सौ स्वाती मोहुर्ले,ममता गुरनुले माधुरी निकुरे विमलाबाई धारणे,कीर्ती मॅकलवार, कपिलाताई मोहूर्ले यांनी यशस्वी प्रयत्न केले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !