जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिला कॅन्सर ग्रस्त महिलेला मदतीचा हात.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिला कॅन्सर ग्रस्त महिलेला मदतीचा हात.


एस.के.24 तास


मुल : शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत मारोडा येथील शेतकरी महिला सौ,बबिता अनिल वाळके हिला कॅन्सरग्रस्त आजारावर उपचार करण्यासाठी 30 हजार रूपयांचे सहकार्य करण्यात आले.


बँकेचे अध्यक्ष,संतोषसिंग रावत यांनी मारोडा येथे आजारी बबिता अनिल वाळके यांच्या घरी भेट देऊन मदतीचा धनादेश सुपूर्द केला.या वेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष,राकेश रत्नावार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,धनंजय चिंतावार,बेलदार समाज मारोडा  संघटनेचे अध्यक्ष,अशोक पुलावार, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल पुलावार,माजी सरपंच,  प्रभू वाळके,माजी सदस्य,वामन पिंपळे,सुधाकर शेंडे,कमलेश वाळके, ग्रामस्थ आणि रुग्णाचे कुटुंबीय उपस्थित होते.


आजारावर उपचार करण्याकरिता आर्थिक सहकार्य केल्याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि गावकरी मंडळींनी बँकेचे अध्यक्ष, संतोषसिंग रावत यांचे आभार मानले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !