पोलीस जवानाचा नाकाबंदी गस्ती दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू.

पोलीस जवानाचा नाकाबंदी गस्ती दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक                                     एस.के.24 तास


गडचिरोली : कुरखेडा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई नाकाबंदी गस्ती दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना 8 फेब्रुवारी 2022 ला  मंगळवारी दुपारी 2:30 वा. सुमारास घडली.

योगेश काळेवार वय,34 वर्ष मृत्यू झालेल्या पोलीस जवानाचे नाव आहे.पोलीस शिपाई योगेश काळेवार हे मंगळवारी दुपारच्या सुमारास बस  स्टॉप च्या समोर पोलीस चमू द्वारे लावण्यात आलेल्या नाकाबंदी गस्ती वाहन तपासणी मोहिमेत सहभागी होते.

दुपारी 2:30 वा. सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले.सहकारी जवानांनी त्यांना जवळच असलेल्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.मात्र उपचारादरम्यान दुपारी 3:00 वा. त्यांचा मृत्यू झाला. पोलीस जवानाची मृत्यूची बातमी सर्वत्र पसरताच पोलीस अधिकारी, कर्मचारी रुग्णालयात धाव घेतली.पोलिसांनी शिव ताब्यात घेतले असून उत्तरीय तपासणीनंतर शव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. 

योगेश काळे वरचे मुळ गाव वाढोणा ता.नागभीड जि.चंद्रपूर आहे.गडचिरोली पोलीस दलात सन 2013 मध्ये शिपाई पदावर रुजू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !